पणजी: हेल्मेट न घातल्याने पणजीतील जुन्या सचिवालयाजवळ वाहतूक पोलिसांनी एका दुचाकीस्वाराला अडविले. त्याची चौकशी केली असता त्याने पर्वरीतून मोबाईलची चोरी केल्याचे उघड झाले. पणजी पोलिसांनी त्याला अटक करून पुढील चौकशीसाठी पर्वरी पोलिसांकडे सुपुर्द केले आहे.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित किरण मोर्गेश (१९) हा मूळचा शिमोगा-कर्नाटक येथील आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन मोबाईल्स सापडले. त्याने ते एका दुकानातून चोरल्याची कबुली दिली आहे. या मोबाईल्सची किंमत सुमारे ३० हजार रुपये आहे.
अधिक सखोल चौकशी केली असता त्याने कर्नाटकमध्येही एक चोरी केल्याची कबुली दिली आहे. तेथे त्याने सुमारे ५.२७ लाखांचे लॅपटॉप चोरले आहेत. याप्रकरणी कर्नाटकातील थुंबा पोलिस स्थानकात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भातची माहिती या पोलिस स्थानकाच्या प्रमुखांना देण्यात आली असून ते त्याला ताब्यात घेण्यासाठी गोव्याकडे निघाले आहेत, अशी माहिती पणजी पोलिसांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.