Calangute Shivaji Statue: कळंगूटमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा वाद चिघळला; आंदोलकांचा पंचायतीत घुसण्याचा प्रयत्न

पोलिसांशी झटापट; पुतळ्याबाबत चर्चेतून मार्ग काढण्याचे आमदार मायकल लोबो यांचे आवाहन
Calangute Shivaji Statue row
Calangute Shivaji Statue rowDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Shivaji Statue: कळंगुट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याच्या मुद्दा आता चिघळत चालला आहे. या पुतळ्याला आक्षेप घेत कळंगुट पंचायतीने संंबंधित संघटनेला दहा दिवसांत पुतळा हटवावा, असे निर्देश दिले होते. त्याविरोधात शिवप्रेमींनी सकाळपासूनच पंचायतीच्या बाहेर ठिय्या मांडला आहे.

कळंगुटच्या सरपंचांनी माफी मागितल्याशिवाय तिथून हटणार नाही, पुतळ्याजवळ येऊन सरपंचांनी माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पंचायतीत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.

Calangute Shivaji Statue row
Calangute Shivaji Statue: कळंगूटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन तणाव, पंचायतीवर दगडफेक; नेमका वाद काय?

कळंगुट पंचयातीने मात्र पुतळा हटविण्याच्या निर्देशांना स्थगिती दिली आहे. तथापि, आंदोलक मात्र सरपंचांनी माफी मागावी, या मागणीवर ठाम आहेत. येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील येथे दाखल झाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू झालेल्या वादावर चर्चेतून तोडगा काढू, असे वक्तव्य कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केले आहे. सर्वांनी शांतता राखावी, कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन लोबो यांनी केले आहे.

आंदोलकांचा जोष हाय!

कळंगुट पंचायतीसमोर आंदोलकांनी टाळ्या वाजवत छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचे गुणगाण करणारी गीते सादर करत आंदोलनात जोष भरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com