तिसवाडी: २०२१ प्रादेशिक आराखडा संपुष्टात आला असून सरकारने नवीन प्रादेशिक आराखडा तयार करावा, अशी मागणी वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी केली. अनेक लोकांना माहिती नाही की, २०२१ प्रादेशिक आराखडा संपुष्टात आल्याने आत्ता नवीन आराखड्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारने ही मागणी त्वरित पूर्ण करावी, असे सिल्वा म्हणाले.
जुने गोवे येथे ‘गोव्याचा निसर्ग, गोव्याचे भविष्य’ प्रदर्शन झाले. त्यावेळी सिल्वा बोलत होते. यावेळी आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर, आपचे उपाध्यक्ष रामराव वाघ, सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर आदी उपस्थित होते.
माझ्या वेळ्ळी मतदारसंघातही ‘गोव्याचा निसर्ग, गोव्याचे भविष्य’ हा विषय घेऊन नवीन प्रादेशिक आराखड्यासंदर्भात जागरूकता बैठक घेतली होती. त्या बैठकीला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्यात इतर ठिकाणीही जागरूकता मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर आम्ही मोहीम सुरू केली असून आज जुने गोवेत पोचलो आहोत.
निसर्ग वाचवायचे असेल, तर प्रादेशिक आराखडा महत्त्वाचा आहे, असे सिल्वा यांनी स्पष्ट केले. यावेळी अमित पालेकर यांनी गाव, नद्या, डोंगर वाचवण्याची गरज असल्याचे विधान केले. आज गोव्यात सर्वत्र नवी बांधकामे येऊ लागल्याने या गोष्टी राहणार नाहीत. पूर्वी कदंब पठारावर जंगल होते, आज येथे काँक्रीटचे जंगल झाले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.