MLA Carlos Almeida: गोवा शिपयार्डला दिलेला 'तो' परवाना नियमबाह्यच

गोवा शिपयार्डने 'निवासी दाखला' गैर मार्गाने घेतला
goa shipyard
goa shipyardDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गोवा शिपयार्ड कंपनीने मुरगाव नगरपालिकेला डावलून 'निवासी दाखला' मिळवला आहे. यात गोवा शिपयार्डने एका प्रकारे मुरगाव नगरपालिकेला अंधारात ठेवले आहे. तसेच शिपयार्डच्या नवीन इमारतीला मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाने देखील परवाना देताना, आपल्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचा दावा वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केला आहे.

(MLA Carlos Almeida alleged on goa shipyard company at Vasco)

goa shipyard
Goa Accident Cases: गोव्यातील अपघातांचे प्रमाण कमी होईना!

गोवा शिपयार्डने मुरगाव नगरपालिकेला अंधारात ठेवून राज्य पालिका संचालकाकडून निवासी दाखला प्राप्त केला आहे. तसेच गोवा शिपयार्डने 'निवासी दाखला' गैर मार्गाने घेऊन राज्य सरकारच्या पालिका नियमांना ठेंगा दाखवला आहे. ही गोवा शिपयार्डने मोठी चूक केली असल्याची माहिती माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दिली.

goa shipyard
Goa Police: गोव्यातील चोपडे पुलावरुन उडी घेतलेल्याचा शोध लागेना!

गैर मार्गाने निवासी दाखला घेणे, सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याने कदाचित शिपर्याडवर एखादी बिगर सरकारी संस्था न्यायालयात गेल्यास शिपयार्डला चपराक बसणार हे सत्य आहे. मुरगाव नगरपालिकेने गोवा शिपयार्डला दिलेला निवासी दाखला मागे घेण्यासाठी पालिका मंडळाची खास बैठक बोलावून, यावर निर्णय घेता येईल अशी माहिती माजी आमदार आल्मेदा यांनी दिली.

मुरगाव नगरपालिकेने थट्टा केली

माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत म्हणाले, गोवा शिपयार्डने गैर मार्गाने आपल्या नवीन प्रशासन इमारतीला 'निवासी दाखला' घेत एका प्रकारे मुरगाव नगरपालिकेची थट्टा केली आहे. यासाठी पालिकेने पुन्हा सर्व नगरसेवकांची खास बैठक बोलावून निवासी दाखला मागे घेण्यासाठी एकमत दाखवावे. असे ते म्हणाले.

गोवा शिपयार्डने पालिकेचे आर्थिक नुकसान केले

नगरसेवक विनोद किनळेकर म्हणाले की, मुरगाव नगरपालिकेला अंधारात ठेवून गोवा शिपयार्डने निवासी दाखला प्राप्त करून पालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे. गोवा शिपयार्डला निवासी दाखला देण्यापूर्वी पालिका मंडळाची बैठक घेणे महत्वाचे होते. पण पालिका संचालकाने गैरमार्गाने गोवा शिपयार्डला निवासी दाखला देऊन मुरगाव नगरपालिकेला बदनाम केले आहे.

गोवा शिपयार्ड गोव्यातील युवकांना नोकरी पासून वंचित ठेवले

नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष दिपक नाईक म्हणाले गोवा शिपयार्ड कंपनीने गोव्यातील पदवीप्रात युवकांना नोकरी पासून सदैव वंचित ठेवले आहे. तसेच गोवा शिपयार्डने मोठ्या प्रमाणात वास्कोतील जागेत विस्तार केला आहे. याचा फायदा परप्रांतियांना जास्त होतो. मग हा गोव्यातील युवकांवर अन्याय आम्ही का सोसावा? गोवा शिपयार्ड कंपनी विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहे. असल्याचं ते म्हणाले.

नगरपालिकेने बैठक बोलाविणे महत्वाचे

पालिका क्षेत्रात कोणतीही इमारत असो यांना निवासी दाखला हा पालिका मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन दिला जातो. गोवा शिपयार्ड कंपनीने आपल्या नवीन प्रशासन इमारतीला निवासी दाखला गैर मार्गाने घेतला असून तो मुरगाव नगरपालिका मंडळाने खास बैठक बोलावून मागे घेण्याचा पुर्ण हक्क आहे. कारण पालिकाच निवासी दाखला नगरसेवकांच्या मान्यतेने देऊ शकते, यासाठी सर्व प्रथम नगरपालिकेने बैठक बोलाविणे महत्वाचे असल्याचं मत माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर मांडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com