Goa Crime: आमदार लोबोंचा गोवा सरकारला घराचा आहेर; किनारी भागात गुन्हेगारी वाढली

राज्यातील किनारी भागात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोके वर काढले- मायकल लोबो
Michael Lobo
Michael Lobo Dainik Gomantak

राज्यातील समुद्र किनाऱ्यावर गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे. त्यामूळे राज्यातील सामान्य नागरिकांना ही याचा त्रास सहन करावा लागत असल्याचं भाजप आमदार मायकल लोबो यांनी म्हटले आहे. गुन्हेगारी वाढल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला तर राज्यशासन ही स्थिती नाकारु शकले असते. मात्र आता भाजप आमदारानेच हे वक्तव्य केल्याने काय भुमिका घ्यावी यावर मुख्यमंत्र्यांना विचार करावा लागणार आहे.

(Michael Lobo has said that the crime has increased in coastal areas of Goa)

लोबो याबाबत बोलताना म्हणाले की, राज्यात गुन्ह्याची तीव्रता कमी असणाऱ्या ठिकाणीही आता गुन्हेगारी वाढली आहे. राज्यात दिवसा खुनाचे प्रकार घडत आहेत. तर यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करण्याची गरज असून यावर तातडीने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

Michael Lobo
Digambar Kamat : मडगावात प्रत्येक प्रभागातील खुल्या जागांचे होणार सौंदर्यीकरण

पोलिस यंत्रणेशी संपर्क करत वाढत्या गुन्हेगारीला अटकाव घालण्यासाठी काय करता येईल यावरुन बैठक घेतल्या आहेत असे ते म्हणाले. आपण नुकतंच म्हापसा पोलिसांसोबत चर्चा केली राज्यात सध्या खुन, अपहरण, अमली पदार्थ, अवैध मद्यविक्री यांसारखे गुन्हे वेगाने वाढले असल्याचं निरीक्षण ही लोबो यांनी नोंदवले.

Michael Lobo
Goa Water Bill Hike : गोव्यात पाणी दरवाढीचा चटका; विरोधक आक्रमक

ताजं उदाहरण म्हणजे नागवा हडफडे येथे दोन दिवसांपूर्वी पहाटे दारूच्या नशेत तरुणांच्या टोळक्याने आपल्याच मित्रावर सपासप वार करून चाकूने भोसकल्याची घटना घडली होती. अनेक तरुण एकाला भोकसण्यासारखे प्रकार करत असतील तर खरचं यावर मुख्यमंत्र्यांनी गांभिर्याने विचार करावा असे ही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com