'दुसऱ्या दिवशीही सुनावणी नाहीच... म्हादईबाबत आम्ही गंभीर आहोत की सुशेगाद?' सरदेसाईंचा सवाल

गुरुवारी याचिका सुनावणीस येईल अशी शक्यता असताना ती झाली नाही.
Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Mhadei Water Dispute: म्हादईप्रश्नी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती पण, त्यादिवशी याचिका सुनावणीस आलीच नाही. दरम्यान, गुरुवारी याचिका सुनावणीस येईल अशी शक्यता असताना ती झाली नाही.

यावरुन गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. म्हादईबाबत आम्ही गंभीर आहोत की सुशेगाद? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

"म्हादईबाबत आम्ही गंभीर आहोत की सुशेगाद? म्हादईवरील सुनावणी बुधवारी होणार होती मात्र ती सुनावणीस आलीच नाही. आजही याचिका सुनावणीस आली नाही, यामुळे गोव्याला न्याय मिळण्यास विलंब होत आहे."

"म्हादईप्रकरणी गोवा सरकारच्या अनास्थेमुळे मला धक्का बसला आहे. आमच्याकडे कोणत्याही प्रकारची रणनीती नाही, कोणतेही पर्याय नाहीत किंवा पुढे कसे जायचे याची कोणतीही माहिती नाही, आता हे स्पष्ट व्हायला लागले आहे"

"जलसंपदा मंत्र्यांना म्हादईबाबत रणनीती ठरवण्यासाठी सभागृह समितीची बैठक बोलावण्याची विनंती केली होती पण त्याचा काही उपयोग झाला नाही."

"गोमन्तकीयांनी भाजप सरकारची म्हादईबाबत अनास्था कर्नाटकशी स्थानिक पक्षाच्या संगनमताचा आणखी एक दाखला म्हणून घ्यावी का?" असे ट्विट आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com