Bicholim News : मये येथे तीन विकासकामांचा शुभारंभ

आमदार शेट : आवश्यक कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील
MLA Premendra Shet inaugurating the beautification work
MLA Premendra Shet inaugurating the beautification workDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : उत्तर गोवा जिल्हा पंचायत निधीतून मये पंचायत क्षेत्रात तीन विकासकामे करण्यात येणार आहेत. रविवारी आमदार प्रेमेंद शेट यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, सरपंच सुवर्णा चोडणकर, पंच विद्यानंद कारबोटकर, भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, सचिव विश्वास चोडणकर आणि अन्य उपस्थित होते.

जिल्हा पंचायत निधीतून आवश्यक ती कामे मार्गी लावण्यासाठी सरकार दरबारी आपण प्रयत्नशील आहे असून याकामी शंकर चोडणकर आग्रही असतात, असे आमदार शेट यांनी सांगितले. स्थानिक आमदार आणि सरकारच्या सहकार्याने जिल्हा पंचायत निधीतून विकासकामे मंजूर झाल्याचे चोडणकर यांनी सांगून आमदार आणि सरकारला धन्यवाद दिले.

MLA Premendra Shet inaugurating the beautification work
Bicholim : नियमित आरोग्य तपासणी करा - चंद्रकांत शेट्ये

या कामांना प्रारंभ : जिल्हा पंचायत निधीतून कुंभारवाडा येथील सरकारी प्राथमिक शाळेचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. गाळवान येथील मैदानावर क्रिकेट पीच तयार करण्यात येणार आहे. तर देवूस-भटवाडी येथील श्री घाडवंस देवस्थानसाठी प्रवेशद्वार बांधण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com