Margao Market : सासष्टी, दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने बुधवारी न्यू मार्केटमधील बेकायदेशीर व अतिक्रमणाविरुद्ध जी कारवाई केली, ती केवळ धूळफेक असल्याचे मार्केटमधील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
एक दिवस कारवाई करून काहीच साध्य होणार नाही. दर आठवड्यात कमीत कमी तीन दिवस तरी अशी कारवाई हवी व ती वेगवेगळ्या ठिकाणी होणे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. फुटपाथवर बसणारे विक्रेते, रस्त्याच्या बाजूला फळे, भाजी विकणारे विक्रेते यांच्याविरुद्धही कारवाई होणे आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
मार्केटमध्ये व मार्केटच्या परिसरात जी जागा पार्किंगसाठी ठेवली होती, तेथेही धंदा सुरू केला आहे. पदपथावरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास होत आहे. पदपथ मोकळा करणे गरजेचे आहे.
गांधी मार्केटमध्ये पाण्याच्या टाकीसाठी जी जागा निश्र्चित केली होती, तिथे काही जणांनी व्यापार सुरू केला आहे. या जागेचे काय? असा प्रश्न न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर विचारतात.
जिल्हा प्रशासनाने जी एका दिवसासाठी धडक कारवाई केली, ती केवळ धूळफेक असल्याचे शिरोडकर याचे म्हणणे आहे. आता प्रशासन पाण्याची टाकी बसविण्यासाठी दुसरी जागा शोधत आहे. जी पूर्वी निश्र्चित केली होती तिथे व्यापार सुरू झाला आहे. त्यांच्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न ते करतात.
काहींना सवलत का?
ज्या दिवशी कारवाई केली त्यातून अनेक जणांवर जाणून बुजून कारवाई करण्यात आलेली नाही. काहींना सवलत का दिली? ज्यांच्यावर कारवाई झाली, त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी परत त्याच आपली व्यवसाय सुरू केला. त्यामुळे पुन्हा पदपथ व मोकळी जागा व्यापली गेली. त्यावर कोण कारवाई करणार ? अशा प्रश्न उपस्थित होत आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.