Crime News : राज्यात गेल्या पाच महिन्‍यांत चार महिलांसह एका बालिकेचा खून

Crime News : महिलांसाठी वातावरण असुरक्षित : २ खुनी हल्‍ले, २७ बलात्‍कार, १९ विनयभंग तर २९ अपहरणे
Crime
Crime Dainik Gomantak

सुशांत कुंकळयेकर

Crime News :

मडगाव, शांतीनगर-वास्‍को येथील वैशाली केसरकर या महिलेचा पतीनेच खून केल्‍याची घटना आज (शुक्रवारी) घडल्‍याने पुन्‍हा एकदा राज्‍यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

१ जानेवारी ते २४ मे या कालावधीत गोव्‍यात एकूण ७९ महिला व बालिकांवर वेगवेगळ्‍या प्रकारचे अत्‍याचार झाले असून त्‍यात पाच खून, दोन खुनाचे प्रयत्‍न, २७ बलात्‍कार, १९ विनयभंग तर २९ अपहरणांचा समावेश आहे. या उलट गोव्‍यात तीन खुनांच्‍या घटना अशा घडल्‍या आहेत, त्‍यात महिलांचाच हात असून हे विराेधाभासी उदाहरण म्‍हणावे लागेल.

आज शुक्रवारी वास्‍को येथे घडलेले खून प्रकरण हे या वर्षातील राज्‍यातील एकंदर १६ वे खून प्रकरण असून महिलांशी संबंधित पाचवा खून आहे. तर पतीकडून पत्‍नीच्या खुनाची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १९ जानेवारी रोजी दीक्षा गंगवार (२७) हिचा पती विनय कटीयार याने काब द राम येथे समुद्रात बुडवून खून केला होता.

१४ एप्रिल रोजी वास्‍को येथे झालेल्‍या एका पाच वर्षीय बालिकेचा खून आहे. दाबोळीत एका बांधकाम प्रकल्‍पावर दोन बिहारी कामगारांनी या पाचवर्षीय बालिकेवर लैगिंक अत्‍याचार करून नंतर खून केला. त्‍यापूर्वी यातील एका आरोपीने या बालिकेच्‍या आईवरही अतिप्रसंग करण्‍याचा प्रयत्‍न केला होता.

८ जानेवारी रोजी सां जुझे आरियल येथे फ्‍लोरेन्‍टिना फर्नांडिस(५३) हिचा खून तिच्या पुतण्‍याने केला हाेता. १९ जानेवारी रोजी दीक्षा गंगवारचा खून पतीने केला.आज वास्‍कोतील खून तिसरा असून चौथा खून हा २१ एप्रिल रोजी वास्‍को येथे घडला होता. गायत्री मराठे (८२) या वृद्धेचा गळा चिरून खून करण्यात आला होता.

तीन खुनांत महिलांचाच सहभाग

तीन प्रकरणांत महिलाच गुन्ह्यात सामील झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. पहिली घटना ८ जानेवारी रोजी घडली. बेंगळुरुस्‍थित कंपनीची सीईओ असलेल्‍या सूचना शेट (३९) हिने स्वतःच्या चार वर्षीय मुलाचा कांदाेळीत खून केला होता.

दुसरी घटना ४ फेब्रुवारी रोजी पिळर्ण येथे घडली. हनिट्रॅपचा सुगावा लागल्याने हाॅटेल व्‍यावसायिक नराेत्तमसिंग धिल्‍लनचा संशयितांनी त्‍याचा खून केला. यात महिलाही सहभागी होती. तिसरी घटना २४ मार्च रोजी खारेबांद येथे घडली प्रेमात अडथळा ठरल्‍याने विश्‍वनाथ सिदनाळ याचा पत्‍नीनेच प्रियकराच्‍या साथीने खून केला.

Crime
Goa-Pune Flight: दुपारी जाणारी फ्लाइट रात्री सुटली; गोव्याहून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांचा 8 तास खोळंबा!

महिलांवरील गुन्हे वाढण्‍यामागे देखरेख पद्धती याेग्‍य नसल्‍याचे कारण वाटते. सध्‍या वास्‍को येथे जी घटना घडली. त्‍या महिलेची तिच्‍या पतीकडून मागची तीन महिने सतावणूक चालू होती. याबाबतीत पोलिसांनी वेळीच लक्ष घालून त्‍या पतीला नियंत्रणात आणले असते तर हा खून झालाच नसता.

- आवदा व्‍हिएगस, अध्‍यक्ष-बायलांचो एकवोट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com