Margao Crime : अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करणाऱ्याचा जामीन फेटाळला

सदर मुलीवर लैंगिक अत्‍याचार झाल्‍याचा वैद्यकीय पुरावा मिळाला नाही
Goa Court Session
Goa Court SessionDainik Gomantak
Published on
Updated on

Margao : घरी पोहोचविण्‍याच्‍या बहाण्‍याने मध्‍यरात्री एका निर्जन ठिकाणी नेऊन एका १४ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर बलात्‍कार करण्‍याचा आरोप असलेला सांकवाळ-वास्‍को येथील लक्ष्‍मण लमाणी याने आपल्‍याला जामीन मिळावा यासाठी केलेला अर्ज बालन्‍यायालयाच्‍या अध्‍यक्ष सायोनारा लाड यांनी आज फेटाळून लावला. ही घटना ४ जुलै रोजी घडली होती.

आईवडील रागावल्‍याने घर सोडून गेलेल्‍या या अल्‍पवयीन मुलीवर नंतर तिच्‍या घरी सोडण्‍याच्‍या बहाण्‍याने संशयिताने मध्‍यरात्रीच्‍या वेळी बलात्‍कार केल्‍याचा आरोप आहे. सदर मुलीला रात्रीच्‍या वेळी एकाने निर्जनस्‍थळी पाहिल्‍यानंतर तिला पोलिस स्‍थानकावर हजर केले.

सदर मुलीला संशयित ओळखत असल्‍याने तिला घरी पोचविण्‍याची जबाबदारी पोलिसांनी त्‍याच्‍याकडे सोपविली होती. मात्र त्‍याने या संधीचा गैरफायदा उठवत हे गैरकृत्‍य केले असा त्‍याच्‍यावर आरोप आहे.

Goa Court Session
Goa Monsoon 2023 : पालयेत धावत्‍या कदंब बसमध्‍ये घुसली फांदी

सदर मुलीवर लैंगिक अत्‍याचार झाल्‍याचा वैद्यकीय पुरावा मिळाला नाही असा दावा करून संशयिताने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र या प्रकरणी त्‍या पीडितेच्‍या आईवडिलांनी हस्‍तक्षेप याचिका दाखल केली होती.

यावेळी त्‍यांच्‍या वतीने बाजू मांडताना ॲड. अमेय प्रभुदेसाई यांनी सांगितले की, केवळ वैद्यकीय पुरावा मिळाला नाही म्‍हणून संशयिताला जामीन मिळू शकत नाही.

हा गंभीर स्‍वरुपाचा गुन्‍हा असून त्‍याला जामीनमुक्‍त केल्‍यास तो पीडितेवर तसेच अन्‍य साक्षीदारांवर दबाव आणू शकतो याकडे त्‍यांनी लक्ष वेधले होते. न्‍या. लाड यांनी हा मुद्दा ग्राह्य धरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com