Mapusa Water Shortage: राज्यभर धो-धो ओतणारा पाऊस, तरीही म्हापशात नळ कोरडेच...

आज पाणीपुरवठा पुन्हा सुरू होण्याची शक्यता
Water Shortage in Mapusa
Water Shortage in MapusaFile Photo
Published on
Updated on

Water Shortage in Mapusa: राज्यात मुसळधार पाऊस सुरू झाला असून आता नद्या-नाले आणि धरणे तुडुंब भरली आहेत. असे असताना म्हापशात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपासून म्हापसा आणि बार्देशमध्ये पाणीच नसल्याने म्हापसेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Water Shortage in Mapusa
Drug Accused Arrested: युपीमधून ड्रग्ज द्यायला आला होता गोव्यात, अडकला फातोर्डा पोलिसांच्या ताब्यात...

माहितीनुसार, दोन दिवस म्हापशात नळ कोरडेच असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सर्वच कामांचा खोळंबा झाल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. याप्रकरणी म्हापसा पालिकेचे ॲड. शशांक नार्वेकर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्याशी चर्चा केली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे पाणी गढूळ बनले असून अस्नोडा जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्रात पाणी फिल्टर करण्यासाठी विलंब होत आहे. यामुळे हा पुरवठा होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात आमदारांनाही कळवले असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. बहुधा आज पाणीपुरवठा पुन्हा सुरू होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com