Mapusa News : म्हापशात जलवाहिनी फुटली ; दुरुस्ती सुरू

Mapusa News : शिवोली, कळंगुटमधील पुरवठ्यावर परिणाम
Mapusa
Mapusa Dainik Gomantak

Mapusa News :

म्हापसा येथील कोर्ट जंक्शन जवळ फिनिक्स अपार्टमेंटसमोर अस्नोडा येथून येणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली. परिणामी, शिवोली तसेच कळंगुट मतदारसंघातील काही भागात पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला.

उपलब्ध माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून येथील गटारातून स्वच्छ पाणी वाहून जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, हे स्वच्छ पाणी कुठून येत आहे, याचा स्रोत कळायला मार्ग नव्हता.

या विषयी साबांखा देखील अनभिज्ञ होते. त्यानंतर सर्वेक्षणअंती हे पाणी फुटलेल्या जलवाहिनीचे असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार सोमवारी (ता. ८) साबांखाने जेसीबीच्या सहाय्याने येथील रस्ता खोदून दुरुस्तीचे काम हाती घेतले. सोमवारी दुपारी खोदकाम सुरू झाल्यानंतर सायंकाळी ही फुटलेली जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरवात झाली.

Mapusa
Goa Accident : सरळ रस्त्यावरच बहुतांश अपघात; पोलिसांचे विश्‍लेषण

जलवाहिनीबाबत अधिकारीही अनभिज्ञ

५० एमएमची ही जलवाहिनी असून याद्वारे कळंगुट, शिवोली मतदारसंघांच्या काही भागांत पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे, म्हापसा व थिवीमधील काही भागात या वाहिनीद्वारे पाणीपुरवठा होतो. ही जुनी ५० वर्षांपूर्वीची वाहिनी असून येथे भूमिगत जलवाहिनी आहे याची कल्पना साबांखाच्या अधिकाऱ्यांनाही नव्हती.

आज पाणी पुरवठा सुरळीत

सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण करुन मंगळवारी (ता.९) सकाळी पाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल, अशी माहिती साबांखाचे सहाय्यक अभियंत्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com