Mapusa Parking : पार्किंगच्या वादातून कारची दुचाकीला ठोकर; दोघे जखमी

Mapusa Parking : आनंद गडेकर (कळंगुट) असे या कारचालकाचे नाव असल्याचे पोलिस चौकशीतून समोर आले. पुढील तपास सुरू आहे.
Mapusa Parking
Mapusa Parking Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Parking :

म्हापसा, पार्किंगवरून झालेल्या क्षुल्लक वादातून दुचाकीला ठोकर देऊन कारचालकाने पळ काढण्याचा प्रकार माडेल-थिवी येथे घडला. या हिट अ‍ॅण्ड रन अपघात प्रकरणात दोघे दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले.

उपलब्ध माहितीनुसार, हा अपघात शनिवार, ९ रोजी दुपारी १.१५ वा.च्या सुमारास माडेल-थिवी येथे घडला. जीए ०७ व्हाय ८१७७ क्रमांकाच्या दुचाकीला ठोकर देऊन इनोव्हा कार चालकाने कारसह पोबारा केला. या अपघातात दुचाकीचालक सुनील कुमार सहानी (५६) व सुधीर कुमार सहानी (३०) हे दोघे गणेशनगर-कोलवाळ येथील रहिवासी जखमी झाले.

सध्या जखमींवर म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचार करून त्यांना घरी पाठवले. या घटनेची माहिती मिळाताच कोलवाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस हवालदार अनिल शेट्ये यांनी पंचनामा केला.

Mapusa Parking
Jelly Fish In Goa: ऐन हंगामात मच्छीमारांसमोर 'नवं संकट', बोटी किनाऱ्यावर नांगरून ठेवण्याची आलीय वेळ, वाचा सविस्तर...

अपघातानंतर घटनास्थळावरून पोबारा केलेली कार थिवी औद्योगिक वसाहतीमध्ये सापडली. ही कार नंतर पोलिसांनी जप्त केली. आनंद गडेकर (कळंगुट) असे या कारचालकाचे नाव असल्याचे पोलिस चौकशीतून समोर आले. पुढील तपास सुरू आहे.

पाठलाग करून दिली धडक

दरम्यान, थिवी रेल्वे स्थानकाच्या आवारात वाहन पार्किंगस्थळी संशयित कारचालक आणि दुचाकीस्वारांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर संशयित कारचालकाने या दुचाकीचा पाठलाग केला आणि घटनास्थळी स्कूटरला ठोकर देऊन धूम ठोकली, असे पोलिस चौकशीतून उघडकीस आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com