Illegally Home Demolish : २२ बेकायदा घरांवर हातोडा; आमदारांनी घेतली सांगोल्डातील बेघरांची भेट

Illegally Home Demolish : दरम्यान, स्थानिक आमदार केदार नाईक यांनी शनिवारी दुपारी याठिकाणी बेघरांची भेट घेतली. सांगोल्डा येथील सर्व्हे क्रमांक ८१/१ मधील ही २२ बांधकामे पाडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.
Mapusa
MapusaDainik Gomantak
Published on
Updated on

Illegally Home Demolish :

म्हापसा, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्तर गोवा कोमुनिदादच्या प्रशासकांनी सांगोल्डा येथील कोमुनिदादच्या जमिनीतील सर्व २२ बेकायदा घरांवर हातोडा फिरवला. पहिल्या दिवशी १५ घरे हटविल्यानंतर शनिवारी (ता.१३) दुसऱ्या दिवशी उर्वरित सात घरे जेसीबीच्या मदतीने पाडण्यात आली.

दरम्यान, स्थानिक आमदार केदार नाईक यांनी शनिवारी दुपारी याठिकाणी बेघरांची भेट घेतली. सांगोल्डा येथील सर्व्हे क्रमांक ८१/१ मधील ही २२ बांधकामे पाडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी ही बांधकामे हटविण्याचा आदेश दिला होता.

शनिवारी कारवाईच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता पोलिस पथक व अतिक्रमण निर्मूलन पथक घटनास्थळी पोहोचले. मजूरवर्ग व जेसीबीच्या साहाय्याने उर्वरित सात घरेही पाडण्यात आली. दुपारी १२ वाजेपर्यंत हे काम संपुष्टात आले. पोलिसांच्या उपस्थितीत डिमॉलिशन प्रक्रिया पार पडली.

Mapusa
Goa Congress : काँग्रेसच्‍या उमेदवाराचा चावडी बाजारात प्रचार

मुख्यमंत्र्यांची भेट; पण ठोस आश्‍वासन नाही

बेघरांची भेट घेतल्यानंतर आमदार केदार नाईक यांना लोकांनी प्रश्न केले की, काल आम्हाला तुमची गरज होती. मात्र, तुम्ही किंवा सरकारचा कुठलाच प्रतिनिधी आला नाही.

त्यावर केदार नाईक म्हणाले की, घरे पाडण्याचा निर्णय हा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होता. यात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. तुमच्या निवाऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा केली आहे.

याविषयी शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांना भेटून उपलब्ध पर्यायांवर चर्चा करू. त्यानुसार तुमचे पाच प्रतिनिधी व स्थानिक पंचसदस्यांना आपण मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातो, अशी ग्वाही आमदारांनी या लोकांना दिली. त्यानुसार सायंकाळी मुख्यमंत्र्यांची भेटही झाली. मात्र, त्यात ठोस असे आश्‍वासन मिळाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com