Mapusa News : प्रत्येकाने जैवविविधतेचे रक्षण करावे : डॉ. सरमोकादम

Mapusa News : बार्देश, तिसवाडीतील ‘जैवविविधता’ समित्यांची बैठक
Mapusa
MapusaDainik Gomantak

Mapusa News :

म्हापसा, मानवाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाची प्रचंड प्रमाणात हानी चालवली आहे. ती वेळीच न रोखल्यास भविष्यात आपल्याला जगण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी पुढे यायला हवे, असे आवाहन गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी केले.

हणजूण-कायसूव पंचायत सभागृहात आयोजिलेल्या बार्देश तालुक्यातील काही तसेच तिसवाडी तालुक्यातील जैवविविधता समित्यांच्या बैठकीत सरमोकादम बोलत होते. यावेळी त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून जैवविविधता समित्यांचे कार्य व जैवविविधतेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.

पर्यावरणीय बदलांचा सजीव प्राण्यांवर विपरित परिणाम होत आहे. अशावेळी आपण सावधपणे जैवविविधतेचे रक्षण करणे काळाची गरज आहे. या जैवविविधतेचे रक्षण केल्यास आपल्याबरोबरच भावी पिढीचे जीवनदेखील सुखकर होईल. प्रत्येक पंचायत क्षेत्रात स्थापन करण्यात आलेल्या जैवविविधता व्यवस्थापन समित्यांनी जैवविविधता घटकांची नोंदणी करून त्यांचे रक्षण करायला हवे.

Mapusa
Goa Accident: कदंब बस आणि मालवाहू जीप यांच्यात समोरासमोर धडक; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही!

गावागावांतील नैसर्गिक जलस्रोत, जंगल संपदा, वनस्पती, प्राणी, पक्षी, जुनाट वृक्ष यांचे रक्षण व जतन व्हायला हवे. तसे केल्यास त्याचा फायदा भावी पिढीलाही होईल आणि त्यांच्यामध्ये याबाबत जागृती होण्यास मदत होईल. जैवविविधता समित्यांना कार्य पुढे नेण्याकरिता गोवा राज्य जैवविविधता मंडळ सर्वतोपरी सहकार्य करण्यास तत्पर असल्याचे सरमोकादम यांनी सांगितले.

मोठमोठ्या प्रकल्पांचे बांधकाम करताना वन खाते तेथील झाडांची कापणी करण्याकरता परवानगी देते; परंतु याची माहिती स्थानिक जैवविविधता समित्यांना नसते. आता यापुढे अशा मोठ्या बांधकाम प्रकल्पांतील झाडे कापण्याची परवानगी देताना वन खाते स्थानिक जैवविविधता समित्यांना कळवणार आहे.

- डॉ. प्रदीप सरमोकादम, सदस्य सचिव, गोवा राज्य जैवविविधता मंडळ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com