Mapusa Crime: पानमसाला देण्याच्या बहाण्याने मतीमंद तरूणीवर बलात्कार; 2 तासात छत्तीसगडच्या आरोपीला अटक

म्हापसा पोलिसांची कारवाई
Mapusa Crime Rape Accused Arrested
Mapusa Crime Rape Accused ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Crime: म्हापशातील एका मतीमंद मुलीवर पान मसाला देण्याच्या बहाण्याने बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपीला म्हापसा पोलिसांनी अवघ्या दोन तासातच अटक केली.

पीडीतेच्या आईने याबाबतची तक्रार दाखल केली आहे. पीडीत तरूणीचे वय 31 वर्षे आहे. पानमसाला देण्याच्या बहाण्याने संबंधित युवकाने तिला घरी बोलावले. आणि तिच्याबर बळजबरी केली. संबंधित तरूणावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मूळचा छत्तीसगडचा रहिवासी आहे.

Mapusa Crime Rape Accused Arrested
Govind Gaude: पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जागेची पाहणी; फातोर्डा स्टेडियमजवळ दोन जागा निश्चित्त...

म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी, पोलिस निरीक्षक शितकांत नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने पावले उचलत संशयिताला ताब्यात घेतले. या संशयिताचा माग काढण्यासाठी पोलिसांनी खबऱ्यांच्या नेटवर्कसह सीसीटीव्हीचाही आधार घेतला.

विजय काश्मिरी (वय 21) असे या आरोपीचे नाव आहे. तो सध्या गौंसावाडो, म्हापसा येथे राहत होता. तो मूळचा छत्तीसगडचा आहे. न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

या तपास पथकात पोलिस उपनिरीक्षक विराज कोरगावकर, रिचा भोसले, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, महेश शेटगावकर, कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, सिद्धी हरमलकर यांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com