Mapusa Corporation Budget : म्हापसा पालिकेचा २७ रोजी अर्थसंकल्प; निवडणूक आयोगाकडून परवानगी

Mapusa Corporation Budget : याविषयी पालिकेने मुख्य निवडणूक अधिकारी आणि पालिका प्रशासन संचालकांना पत्र लिहून पालिका मंडळाचे बजेट मंजूर करण्यासाठी पालिकेला बैठक घेण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती.
Mapusa Corporation
Mapusa Corporation Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Corporation Budget :

म्हापसा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रलंबित असलेल्या अर्थसंकल्पावर चर्चेसह त्याला मंजूरी देण्यासाठी म्हापसा पालिकेला विशेष बैठक घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून अखेर परवानगी मिळाली आहे.

येत्या २७ मार्च रोजी पालिकेची विशेष बैठक घेतली जाईल. माहितीनुसार, गेल्या १८ मार्च रोजी आपल्या वार्षिक बजेटवर चर्चा करण्यासाठी व त्याला मंजूर करण्यासाठी विशेष बैठक आयोजिली होती. मात्र, आचारसंहितेमुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती.

याविषयी पालिकेने मुख्य निवडणूक अधिकारी आणि पालिका प्रशासन संचालकांना पत्र लिहून पालिका मंडळाचे बजेट मंजूर करण्यासाठी पालिकेला बैठक घेण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती.

Mapusa Corporation
Goa Congress: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अटक करा; काँग्रेसची मागणी

यासंदर्भात पालिका नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर यांनी सांगितले की, आम्ही मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना पत्र लिहून वार्षिक अंदाजपत्रकासाठी बैठक घेण्यास मान्यता द्यावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार, विशेष पालिका बैठक घेण्यास मान्यता मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com