Crime News : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवल्याची तक्रार; अपहरणाचा गुन्हा दाखल

Crime News : या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा पीडिता कळंगुटमध्ये असल्याचे समजले. पोलिसांनी शनिवारी सकाळी तिची एका हॉटेलवरून सुटका केली. तसेच संशयित अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले.
Crime News
Crime News Dainik Gomantak

Crime News :

म्हापसा येथील पोलिस हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला. याप्रकरणी मुलीची आई फिर्यादी आहे. अपहरणकर्ता देखील युवकही अल्पवयीनच आहे.

दरम्यान, पोलिसांनी कळंगुटमधील एका हॉटेलमधून पीडितेची सुटका करीत दोघांचीही रवानगी सुधारगृहात केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (ता. १७) घडली. यातील संशयित हा १७ वर्षीय अल्पवयीन आहे. संशयिताने आपल्या मुलीला शुक्रवारी (ता.१७) फूस लावून तिला पळवून नेले, असे पीडिताच्या आईने तक्रारीत म्हटले होते.

Crime News
MSP For Goa Mango: आंब्याला आधारभूत किंमत देण्याचा विचार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा पीडिता कळंगुटमध्ये असल्याचे समजले. पोलिसांनी शनिवारी सकाळी तिची एका हॉटेलवरून सुटका केली. तसेच संशयित अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी संशयिताविरूध्द भा.दं.सं.च्या कलम ३६३ व गोवा बाल कायदा कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंद केला. त्यानंतर जबानी नोंद करून पीडितेची रवानगी सुधारगृहात केली. तसेच संशयित युवकाला बाल न्याय मंडळाकडे सादर करून त्याचीही रवानगी सुधारगृहात केली.

दरम्यान, पीडित व संशयिताची पोलिसांनी गोमेकॉत वैद्यकीय चाचणी केली असून हा चाचणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई पोलिस करणार आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाबलो परब हे करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com