Goa News : अनेक गोमंतकीय साईबाबांचे भक्त : गोपीनाथ कोते पाटील

Goa News : साईनाथ मंदिरातर्फे मान्यवरांचा सन्मान
Goa
Goa Dainik Gomantak

Goa News :

बार्देश, गोव्याचे लोक साईभक्त असून तेवढेच प्रेमळ आहेत. गोव्यातील लोकांना साईबाबांनी आपले कसब दाखवून दिले आहे. साईबाबा १६ वर्षांचे असताना शिर्डीला आले व ६२ वर्षे वास्तव्य करून राहिले, असे शिर्डी येथील साईबाबा संस्थांचे माजी ट्रस्टी गोपीनाथ बयाजी कोते पाटील यांनी सांगितले.

एकतानगर, हाउसिंग बोर्ड, म्हापसा येथील साईनाथ मंदिरात साईबाबांची नूतन मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित स्मरणिका प्रकाशन व सत्कार समारंभावेळी कोते पाटील बोलत होते.

यावेळी नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर, नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर, समाजसेवक हनुमंत वारंग, गणेशपुरी येथील गणेश मंदिराचे अध्यक्ष सत्यवान भिवशेट, प्रा. रवींद्र फुगेरी, साईंसेवक प्रेमानंद ऊर्फ बाबू कोचरेकर, साई सेवक वज्रधर ऊर्फ राजू कळंगुटकर तसेच साईनाथ मंदिराचे अध्यक्ष संतोष बामणे, उपाध्यक्ष गजानन सुतार,

Goa
Goa: राज्यात दोन ठिकाणी आगीच्या घटनेत मोठे नुकसान हानी; जीवितहानी टळली

सचिव जयराम नाईक, सहसचिव मुजराज फडके, खजिनदार अरुण कोरगावकर, उपखजिनदार सत्यवान नाईक, मुखत्यार प्रकाश धुमाळ, सल्लागार विश्वनाथ ऊर्फ उल्हास शेट कळंगुटकर, सदस्य प्रताप नाईक, समीर शिरोडकर, लवू नाईक, मनोहर गवस, शेखर गावंस, शंकर आंबेकर इत्यादी उपस्थित होते.

प्रारंभी वज्रधर कळंगुटकर यांनी ओळख करून दिली. सूत्रसंचालन प्रकाश धुमाळ यांनी केले. आभार अध्यक्ष संतोष बामणे यांनी मानले.

कोते पाटील व अन्य मान्यवरांचा सन्मान

यावेळी कोते पाटील यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन अध्यक्ष संतोष बामणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर यांचा सत्कार शर्मिला बामणे यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर, समाजसेवक हनुमंत वारंग, गणेशपुरी येथील गणेश मंदिराचे अध्यक्ष सत्यवान भिवशेट, प्रा. रवींद्र फुगेरी, साईंसेवक प्रेमानंद ऊर्फ बाबू कोचरेकर, साई सेवक वज्रधर ऊर्फ राजू कळंगुटकर यांचाही सत्कार करण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष संतोष बामणे व त्यांची पत्नी शर्मिला बामणे यांचाही सन्मान करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com