Mango अजूनही खातोय भाव; दर चढेच

मानकुराद दीड ते दोन हजार रुपये डझन
Mango
Mango Dainik Gomantak
Published on
Updated on

बाजारात मोठ्या प्रमाणात आंबे दाखल होऊ लागले आहेत. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांची आवक घटल्याने पणजी बाजारात मध्यम आकाराचा मानकुराद दीड हजार ते बाराशे रुपये प्रति डझन दराने विकला जात आहे.

हापूस हजार ते आठशे रुपये दराने विकला जात असून महिन्याभरापूर्वी मानकुराद आंब्यासोबतच हापूस, पायरी, शेंदुरी, शाबेर अशा विविध प्रकारचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. हजार आठशे दरम्यान प्रतिडझन दराने विकले जात आहे.

Mango
karnataka Election : ग्रामीण कर्नाटकचा विकास भाजपच करू शकतो : मुख्यमंत्री डॉ. सावंत

गोव्यात इतर वर्षांच्या तुलनेत यंदा आंब्याच्या उत्पादनात प्रामुख्याने घट झाली आहे. याची अनेक कारणे असू शकतात. परंतु प्रमुख कारण हवामान बदल हे असून मार्च महिन्यात राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्याचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला. त्यामुळे मागील काही वर्षांच्या तुलनेत आंब्याच्या पिकात घट झाली आहे.

राज्यातील बाजारपेठांमध्ये अव्वाच्या सव्वा दराने आंब्यांची विक्री होत आहे. आंबा उत्पादनात घट झाल्याने मागणी वाढली आहे. परंतु ज्या पद्धतीने आंब्याचे दर आकारले जात आहेत. तसेच रसायनयुक्त आंबे मिळाल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. अन्न व औषध प्रशासन संचालनालयाने आंब्यांची चाचणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Mango
Heavy Rain In Goa : राज्यात अतिवृष्टीत 100 टक्के पेक्षा जास्त वाढ : डॉ. रमेश कुमार

पुरूमेंताचीही लगबग

पावसाळा जवळ येत असल्याने नागरिक पुरूमेंतच्या तयारीला लागले असून पावसाळ्यासाठी लागणारी सोले, तिरफळे, सुकी मासळी, लाल मिरची, विविध मसाले आदींची खरेदी नागरिक मोठ्या प्रमाणात करत आहेत. मात्र मिरची अधिकच तिखट झाली असून स्थानिक मिरची १००० रूपये प्रती किलो दराने विकली जात असल्याने मिरची खरेदी करताना ग्राहकांना विचार करावा लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com