Mandrem News : मांद्रेतील राजकारणाला भाजपकडून अकस्मात कलाटणी; सचिन परब ठोकणार काँग्रेसला रामराम

Mandrem News : : दोन दिवसांत करणार भाजपमध्ये प्रवेश; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते पणजीत पोचले, तेव्हाच परब यांचा राजकीय प्रवास दिशा बदलेल, याचा अंदाज आला होता.
Sachin Parab
Sachin ParabDainik Gomantak

Mandrem News :

पणजी, विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार मानले जाणारे सचिन गोपाळ परब हे कॉंग्रेसला रामराम ठोकणार आहेत. येत्या दोन दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करतील.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते पणजीत पोचले, तेव्हाच परब यांचा राजकीय प्रवास दिशा बदलेल, याचा अंदाज आला होता.

याबाबत परब यांना विचारले असता, भाजप प्रवेश कधी ते आताच सांगत नाही. आधी मला कॉंग्रेसचा अधिकृतपणे राजीनामा तरी देऊ द्या, असे ते म्हणाले. येत्या दोन दिवसांत राजकीय प्रवासाविषयी घोषणा करेन, असेही त्यांनी सांगितले.

Sachin Parab
Power Cut In Goa: 29 एप्रिल ते 4 मे नावेली, मांडोपा, फोंडा आणि दवर्लीत वीज पुरवठा खंडित होणार; असंय नियोजन

पक्षाने दगा दिल्याची भावना

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर दावा केला होता. त्यावेळी बाबी बागकर यांना आता उमेदवारी देऊ, पुढील २०२२ च्या निवडणुकीवेळी परब यांचा विचार करू, असे कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांना सांगितले होते.

मात्र, २०२२ च्या निवडणुकीत कॉंग्रेसने हा मतदारसंघ गोवा फॉरवर्डला दिला. त्याचवेळी कॉंग्रेसकडून फसवणूक झाल्याचे त्यांना वाटू लागले होते. अखेर त्यांनी कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभेसाठी अनेक दावेदार

मांद्रेत सध्या दयानंद सोपटे हे उमेदवारीचे दावेदार मानले जातात. मगोपचे जीत आरोलकर यांची भाजपशी जवळीक वाढली आहे.

ते भाजपमध्ये जातील, अशी चर्चा आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपमध्ये येऊ शकतात. त्यातच आता सचिन परब हेही भाजपमध्ये येणार असल्याने भाजपच्या एका उमेदवारीसाठी मांद्रेत अनेक दावेदार तयार होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com