Madgaon News : चोरी-घरफोडीमुळे लोकांमध्ये भीती; समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल

Madgaon News : बेताळभाटीत दुपारी १२.३० वा. बंगला फोडण्याचा प्रयत्न
Madgaon
MadgaonDainik Gomantak

Madgaon News :

मडगाव, गेल्या दोन दिवसांत राज्यात चोरी, घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बेताळभाटी येथे दिवसाढवळ्या बंगला फोडण्याचा प्रयत्न झाला तर रविवारी पाटे-बाळ्ळीत बंगला फोडून साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. उत्तर गोव्यातील हणजूण येथील डिवाईन होलसेल मद्य विक्रीच्या दुकानात काम करणाऱ्या यश छत्रीझा याने दीड लाख रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्यासह अंदाजे दोन लाख रुपये चोरल्याची तक्रार पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

बेताळभाटी येथे असलेल्या एका बंगल्याचा भर दिवसा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करण्याचा दोघा चोरट्यांचा प्रयत्न स्थानिकांनी हटकल्याने फसला.

याचवेळी बंगल्याचा केअर टेकर तिथे आल्याने या चोरट्यांनी तिथून पळ काढला. हे संपूर्ण दृष्य बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले. हे प्रकरण रविवारी भर दुपारी १२.२० वाजल्यानंतर घडले होते. या बंगल्यात कोणी राहत नसल्याची संधी साधून दोन अज्ञात चोरट्यांनी आपण बरोबर आणलेल्या अवजारांच्या साहाय्‍याने बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.

या बंगल्यातील सर्वजण विदेशात कामाला आहेत. त्यांनी या बंगल्याची देखभाल करण्यासाठी केअर टेकरची नेमणूक केली आहे. हा केअर टेकर अधूनमधून या बंगल्यात ये-जा करीत असतो. हा बांगला लव्हर्स बीचवर जाण्याच्या रस्त्यावर आहे. या प्रकरणी कोलवा पोलिस स्थानकात कोणतीही तक्रार नोंद झाली नसल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

रविवारी पहाटे बाळ्ळीत घरफोडी करून चोरट्यांनी इनासिओ फर्नांडिस यांच्या घरातून सोन्याच्या दागिन्यांसह साडेपाच लाखांचा ऐवज चोरून नेला. तर बेताळभाटीत भर दिवसा बंगल्याचा दरवाजा तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. केअरटेकरने हटल्याने चोरटे पसार झाले, पण ते सीसीटीव्हीत कैद झाले. फर्नांडिस यांच्या घराच्या छपराची कौले काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. साडेपाच लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. सोमवारी सकाळी चोरी झाल्याचे त्‍यांना समजताच फर्नांडिस यांनी कुंकळ्ळी पोलिसांना याची माहिती दिली.

Madgaon
Goa College of Agriculture : गोवा कृषी महाविद्यालयात गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण

फॉरेन्सिक पथकाने घरातील हातांचे ठसे घेतले. पुढील तपास कुंकळ्ळी पोलिस निरीक्षक डायगो ग्रॅसिअस यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

एका चोरट्याला अटक

मडगाव चोरीप्रकरणी मडगाव पोलिसांनी एकाला अटक केली. बाबू बसवराज कट्टीमणी (३७) असे संशयिताचे नाव आहे. भा.दं.सं.च्या ४५७ व ३८० कलमाखाली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर पुढील तपास करीत आहेत. संदीप आडारकर हे तक्रारदार आहेत.

दुचाकीवरून आलेल्या अज्ञात संशयिताने शौचालयाच्या दरवाजाची कडी तोडून आत शिरून आठ नळ व शॉवर फिटिंगचे साहित्य चोरून नेल्याची तक्रार तक्रारदाराने मडगाव पोलिस ठाण्यात केली होती. २५ मार्च रोजी चोरीची वरील घटना घडली होती. संशयित मूळ बेळगाव येथील आहे, अशी माहिती देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com