Loksabha Election : उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये लढाई; तानावडेंची टीका

Loksabha Election : भाजप कार्यकर्त्यांनी बूथ मजबूत करावे
Loksabha Election
Loksabha Election Dainik Gomantak

Loksabha Election :

सासष्टी, काँग्रेसला अजून उमेदवार निश्र्चित करता येत नाही. उमेदवारीसाठी त्यांच्यामध्येच लढाई सुरू झाली आहे. शेवटच्या क्षणी ते काहीही काम न करणारी किंवा कामाचा अनुभव नसलेला उमेदवार मतदारांच्या गळ्यात बांधण्याचे काम करेल, अशी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज फातोर्ड्यात केले.

कार्यकर्ता, महिला, युवा वर्ग ही भाजपची ताकद असून संघटन व बूथ मजबूत करणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचे तानावडे यांनी सांगितले. फातोर्डा येथे कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते.

आम्हा सर्वांना मोदीची गॅरंटी आहे. दक्षिण गोव्यातून भाजपचा उमेदवारच निवडून देण्याची गॅरंटी आम्ही मोदींना देऊया, असे आमदार दिगंबर कामत म्हणाले.

माजी आमदार व सरचिटणीस दामू नाईक, माजी खासदार व सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनीही मनोगत व्यक्त केले. फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर यांनी स्वागत केले. नगरसेविका श्र्वेता लोटलीकर यांनी आभार मानले, तर दिलीप नाईक यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.

Loksabha Election
Goa Accident Death: कारच्या धडकेने जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू

‘पल्लवी धेंपेंना निवडून आणा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी गोव्यातून दोन्ही भाजपचे खासदार पाठवणे महत्त्वाचे आहे. दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपे या पंतप्रधानांच्या तसेच कमळाच्या प्रतिनिधी आहेत. त्यांना भरघोस मतांनी निवडून आणा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी केले.

‘सर्वांनी सहकार्य करावे’

भारतीय जनता पक्ष सर्वांगीण विकासावर भर देत आहे हे आम्ही गत दहा वर्षांत पाहिले आहे. नारी शक्ती मजबूत करण्याचे पक्षाचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पल्लवी धेंपे यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com