Loksabha Election : फातोर्ड्यात भाजप की काँग्रेस? विजय, दामूची कसोटी

Loksabha Election : लोकसभा दोन्‍ही पक्षांसाठी महत्त्‍वाची
Goa Loksabha Election
Goa Loksabha Election Dainik Gomantak

Loksabha Election :

फातोर्डा मतदारसंघात विधानसभेत दोनवेळा भाजपने बाजी मारली असली तरी परंपरेने या मतदारसंघात काँग्रेस पक्षानेच समाधानकारक कामगिरी साधली आहे. सध्‍या काँग्रेसची जागा गोवा फॉरवर्डने घेतली आहे.

मात्र आजवर फक्‍त दोन अपवाद सोडले तर प्रत्‍येकवेळी येथे काँग्रेसनेच आघाडी घेतली आहे. ही आघाडी हजार-बाराशे मतांच्‍या आसपासच असल्‍याने या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप या दोन्‍ही पक्षांची मते जवळपास समसमान आहेत, असे म्‍हटल्‍यास वावगे ठरणार नाही.

एकेकाळी फातोर्डा मतदारसंघ हा ख्रिस्‍ती एसटी बहुल मतदारसंघ होता. मात्र मागच्‍या १५ ते २० वर्षांत फातोर्डा हा भाग मडगावचे उपनगर म्‍हणून वाढू लागला. बाहेरून आलेले कित्‍येक लोक आता फातोर्ड्यात स्‍थायिक झालेले आहेत. त्‍यात बहुतांश लोक हिंदू असल्‍याने या मतदारसंघातील हिंदूंची टक्‍केवारी आता ख्रिस्‍ती टक्‍केवारीपेक्षा अधिक झालेली आहे. यामुळेच भाजपने आपली मतपेटी या मतदारसंघात बऱ्यापैकी तयार केलेली आहे.

Goa Loksabha Election
Goa Flights: फक्त 1991 रुपयांत करा गोवा ते जळगाव विमान प्रवास ; Fly91 च्या नवीन उड्डाणांची घोषणा

फातोर्डा मतदारसंघात मागच्‍या तीन विधानसभा निवडणुकीत भाजपचे दामू नाईक यांना विजय सरदेसाई यांच्‍याकडून पराभव स्‍वीकारावा लागला ही गोष्‍ट जरी खरी असली तरी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला नेहमीच दहा हजारांच्‍या आसपास मते मिळाली आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्‍या कित्‍येक जुन्‍या कार्यकर्त्यांनी सरदेसाई यांना मतदान केले होते. मात्र आता लोकसभेची निवडणूक विजयच्‍या नव्‍हे तर मोदींच्‍या कार्डवर लढवली जाणार आहे. त्‍यामुळे दामूंना सोडून गेलेले मूळ भाजप मतदार पुन्‍हा भाजपकडे येणार का, यावर कोण आघाडी घेईल हे स्‍पष्‍ट होणार आहे.

विजय सरदेसाईंची भूमिका काय?

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपला पाठिंबा काँग्रेसला जाहीर केला असला तरी फातोर्डा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला मते मिळावीत यासाठी ते स्‍वत:ला झोकून देऊन काम करतील का, हा प्रश्‍‍न महत्त्वाचा आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असताना ते इंग्‍लंडला युकेत राहणाऱ्या गोमंतकीयांना भेटण्‍यासाठी गेले आहेत. आज ते गोव्‍यात परतणार. ते या निवडणुकीत किती सक्रिय होतील हे पाहणे गरजेचे आहे.

दामू ख्रिस्‍ती मते भाजपकडे वळवतील?

भाजपचे दामू नाईक हे जरी हिंदुत्‍ववादी पक्षाचे नेते असले तरी फातोर्ड्यात त्‍यांची स्‍वत:ची अशी ख्रिस्‍ती मते आहेत. मडगाव नगरपालिका निवडणुकीत भाजपने फातोर्ड्यातून दोन ख्रिस्‍ती नगरसेवक निवडून दिले.

काही ख्रिस्‍ती मतदार विजयच्‍या विरोधात असल्‍याने विधानसभा निवडणुकीत त्‍यांनी दामू नाईक यांना पाठिंबा दिला होता. आता लोकसभा निवडणुकीत हीच मते पल्‍लवी धेंपे यांच्‍या बाजूने वळवू शकतील का, हेही पाहणे गरजेचे आहे.

फातोर्ड्यात मागच्‍या तीन विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव स्‍वीकारावा लागला असला तरी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपने नेहमीच दहा हजारांच्‍या वर मते मिळवली आहेत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यंदाची लोकसभा निवडणूक मोदींना निवडून आणण्‍यासाठी असल्‍याने यावेळी भाजप मतांची संख्‍या १३ हजारांवर जाईल. त्‍यासाठी आम्‍ही झटून काम करत आहोत.

- वल्‍लभदास रायकर,

सरचिटणीस (फातोर्डा भाजप)

Goa Loksabha Election
Goa Daily News Wrap: सांगोल्डा कारवाई, लोकसभा निवडणूक, गुन्हे; राज्यातील ठळक घडामोडींचा आढावा

फातोर्डा हा मुळात काँग्रेसला पाठिंबा देणारा मतदारसंघ. या मतदारसंघाने कधीच काँग्रेसचा अपेक्षाभंग केलेला नाही. मागच्‍या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला फातोर्ड्यात आघाडी मिळाली होती.

यावेळी कारगिल युद्धाचे हिरो कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस हे उमेदवार आहेत. अशा परिस्‍थितीत फातोर्डा मतदारसंघाकडून त्‍यांना नाकारणे शक्‍यच नाही. यावेळीही फातोर्ड्यात काँग्रेस पक्षच आघाडी घेईल.

- योगेश नागवेकर,

काँग्रेसचे पदाधिकारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com