Bicholim
BicholimDainik Gomantak

Bicholim News : काँग्रेसकडे कार्यकर्तेच नाहीत : राजेश पाटणेकर

Bicholim News : आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि माजी आमदार राजेश पाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या घरोघरी प्रचाराचा प्रारंभ करण्यापूर्वी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि राजेश पाटणेकर बोलत होते.

Bicholim News :

डिचोली, भाजप सरकारने केलेला विकास यामुळे डिचोली मतदारसंघात भाजपला अनुकूल वातावरण असून श्रीपाद नाईक यांना डिचोलीतून मोठी आघाडी मिळणारच. त्याचबरोबर श्रीपादभाऊ पुन्हा निवडून येणार, असा ठाम विश्वास आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी व्यक्त केला.

तर डिचोलीत प्रचार करण्यासाठी काँग्रेसकडे कार्यकर्तेच नाहीत. असा दावा माजी सभापती राजेश पाटणेकर यांनी केला आहे.

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि माजी आमदार राजेश पाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या घरोघरी प्रचाराचा प्रारंभ करण्यापूर्वी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि राजेश पाटणेकर बोलत होते.

Bicholim
Goa BJP slams K'taka CM: 'स्वत:च्या राज्यातील समस्यांकडे लक्ष द्या', गोवा भाजपने सिद्धरामय्यांवर टीका का केली?

यावेळी भाजपचे डिचोली मतदारसंघाचे प्रभारी संतोष मळीक, नगराध्यक्ष कुंदन फळारी, मेणकूरेचे सरपंच गुरूदास परब, लाटंबार्सेचे सरपंच पद्माकर मळीक, मुळगावच्या सरपंच तृप्ती गाड, भाजप मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर, उपाध्यक्ष शरद शेट्ये, सरचिटणीस डॉ. कौस्तुभ पाटणेकर,

तुळशीदास परब, वल्लभ साळकर, महिला मोर्चा अध्यक्ष शर्मिला पळ, बॉनेक डायस, शेखर परवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.त्यानंतर नाईकनगर-बोर्डे परिसरातून प्रचाराला प्रारंभ करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com