Loksabha Election 2024: एक उमेदवार लादलेला, दुसरा मागलेला; दोन्‍ही चेहरे नवीन

Loksabha Election 2024: सुशिक्षित, स्‍वच्‍छ चारित्र्य; मतदारांची मोठी ‘परीक्षा’
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 Dainik Gomantak

Loksabha Election 2024 :

मडगाव, भाजपने पहिल्‍यांदाच ‘आऊट ऑफ द बॉक्‍स’ जाऊन दक्षिण गोव्‍यातून लोकसभेसाठी पल्‍लवी धेंपे यांच्‍या रुपाने महिला उमेदवार दिल्‍यानंतर काँग्रेसकडून त्‍यास काय उत्तर मिळणार, याची सर्वांना उत्‍सुकता होती.

अखेर काँग्रेसने ‘कारगिल हिरो’ म्‍हणून ज्‍यांना ओळखले जाते, त्‍या कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस यांना उमेदवारी देऊन भाजपला तोडीस तोड उत्तर दिले. त्‍यामुळे दक्षिण गोव्‍यात पहिल्‍यांदाच दोन्‍ही बाजूने नवीन उमेदवार मैदानात उतरविले आहेत. विशेष म्‍हणजे हे दोन्‍ही उमेदवार स्‍वच्‍छ प्रतिमा असलेले आहेत आणि सध्‍या दक्षिण गोव्‍यात ही जोरात चाललेली चर्चा आहे.

सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले कुडचडे येथील चार्टर्ड अकाउंटंट प्रदीप काकोडकर यांना विचारले असता ते म्‍हणाले की, पहिल्‍यांदाच दक्षिण गोव्‍यात दोन्‍ही पक्षांनी चांगले आणि वेगळी क्षमता असलेले उमेदवार उभे केले आहे.

Loksabha Election 2024
Goa's Daily News Wrap: गोव्यातील क्राईम, राजकारण, पर्यटन, क्रीडा क्षेत्रातील ठळक घडमोडींचा आढावा

दोन्‍ही उमेदवार शिक्षित आहेत. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे ते युवा असल्‍याने त्‍यांच्‍यात काम करण्‍याची क्षमता आहे. दोघांवरही कुठलाही काळा डाग नाही. त्‍यामुळे पहिल्‍यांदाच दक्षिण गोव्‍यातील मतदारांना चांगल्‍या उमेदवारांना मतदान करण्‍याची संधी मिळणार आहे. कुणीही जिंकून येऊ दे, दक्षिण गोव्‍यातून जो जिंकणार तो सक्षम खासदार असणार, हे आता स्‍पष्‍ट झाले आहे.

राजकीय विश्‍‍लेषक क्‍लिओफात कुतिन्‍हो आल्‍मेदा म्‍हणाले, पल्‍लवी धेंपे यांना उमेदवारी न देता ती नरेंद्र सावईकर यांना देण्‍यात यावी अशी स्‍थानिक भाजप नेतृत्‍वाची मागणी होती. कार्यकर्त्यांचीही तीच भावना होती.

मात्र असे असतानाही भाजपच्‍या केंद्रीय नेत्‍यांनी पल्‍लवी धेंपे यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब केले. काँग्रेसच्‍या बाबतीत उलट परिस्‍थिती होती. काँग्रेस नेत्‍यांना यावेळी उमेदवारी गिरीश चोडणकर यांना द्यायची होती.

मात्र स्‍थानिक नेत्‍यांनी कॅप्‍टन विरियातो यांच्‍या नावाची मागणी केली आणि शेवटी केंद्रीय नेत्‍यांनी ती मान्‍य केली. त्‍यामुळे आता केंद्राने लादलेला उमेदवार जिंकून येणार की स्‍थानिक कार्यकारिणीने मागून घेतलेला उमेदवार जिंकणार हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरेल.

दोन्‍ही उमेदवार चांगले आहेत यात दुमत नाही. पण माझ्‍या मते मतदारांनी अजूनही आपला निर्णय पक्‍का केलेला नाही. सध्‍या मतदार या दोन्‍ही उमेदवारांची एकमेकांशी तुलना करत आहेत. दक्षिण गोव्‍यातील मतदारांना जो उमेदवार चांगला वाटेल, त्‍यालाच ते मत देतील.

- ॲड. प्रणव सावर्डेकर

कुठलाही नाही काळा डाग

दोन्‍ही उमेदवार नवीन आणि स्‍वच्‍छ प्रतिमेचे आहेत ही गोष्‍ट मान्‍य. मात्र एक उमेदवार गोव्‍यातील कार्यकर्त्यांवर दिल्‍लीतून लादला गेला आहे तर दुसरा उमेदवार दिल्‍लीच्‍या पक्षश्रेष्‍ठींना उमेदवार म्‍हणून हवा असताना स्‍थानिक कार्यकारिणीने तगादा लावल्‍याने आणि प्रभावी मागणी केल्‍यामुळे मिळाला आहे.

- क्‍लिओफात कुतिन्‍हो आल्‍मेदा, राजकीय विश्‍‍लेषक

पहिल्‍यांदाच दक्षिण गोव्‍यात दोन्‍ही पक्षांनी चांगले उमेदवार उभे केले आहे. दोन्‍ही उमेदवार शिक्षित आहेत. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे ते युवा असल्‍याने त्‍यांच्‍यात काम करण्‍याची क्षमता आहे. सर्वांत महत्त्‍वाचे म्‍हणजे दोघांवरही कुठलाही काळा डाग नाही. कुणीही जिंकून येऊ दे, जो जिंकणार तो सक्षम खासदार असणार, हे निश्‍चित.

- प्रदीप काकोडकर, चार्टर्ड अकाउंटंट (कुडचडे)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com