Taxi Driver Assault
Taxi Driver AssaultDainik Gomantak

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Taxi Driver Assault: बार्देश तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक व पर्यटक यांच्यात वादाचे अनेक प्रकार घडले आहेत.

Taxi Driver Assault

परप्रांतीय भाडेकरूंनी पेडण्यातील स्थानिक तरुणाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच राज्यात जीवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या मद्यधुंद पर्यटकांनी स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला केल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पाचजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बागा-कळंगुट येथे भाडे सोडून घरी परतणाऱ्या शैलेश शेटगावकर या टॅक्सीचालकास पंजाब नोंदणीकृत (क्रः पीबी-10/जेए- 9029) खासगी गाडीतून आलेल्या 11 जणांच्या टोळक्याने रस्त्यात अडवून जबर मारहाण केली.

याप्रकरणी कळंगुट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही घटना शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित गोविंद कुमार, दिवाकर मराठे, पंकज कुमार, आदित्य साहू तसेच श्याम चतुर्वेदी यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

यंदा आठहून अधिक टॅक्सीचालकांवर हल्ले समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक टॅक्सीचालकांसह लोकांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कळंगुटचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Taxi Driver Assault
Goa Police: गस्त वाढवा, संशयास्पद व्यक्तींची धरपकड करा! वाढत्या चोरींच्या पार्श्वभूमीवर गोवा डिजीपींच्या पोलिसांना सूचना

वारंवार होत आहेत वाद

बार्देश तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक व पर्यटक यांच्यात वादाचे अनेक प्रकार घडले आहेत. बऱ्याच प्रकरणांत वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आहे. यामुळे कटुता निर्माण झाली आहे. नुकताच स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला झाल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

अश्लील हातवारे आणि अर्वाच्च शिव्या

शनिवारी पहाटे घडलेल्या मारहाण प्रकरणात माझी काहीच चूक नव्हती. माझ्या गाडीमागून आलेल्या पंजाब नोंदणीकृत गाडीतील मद्यधुंद पर्यटकांनी विनाकारण मला अश्लील हातवारे करत अर्वाच्च शिव्या देऊन मारहाण केल्याचे शेटगावकर यांनी सांगितले. जखमी शैलेश यांच्यावर म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com