डिचोलीतील 'त्या' उर्वरित घरांविरोधात कारवाई, अन्य घरेही जमीनदोस्त

घरमालकांना मिळणार भुखंड, घरांच्या फेरमूल्यांकनाचा आग्रह
Bicholim
BicholimDainik Gomantak

डिचोली : राज्य महामार्गाला (State highways) अडथळा ठरणाऱ्या डिचोलीतील (Bicholim) वाठादेव भागातील उर्वरित घरांविरोधात कालपासून पुन्हा कारवाई हाती घेताना आणखी काही घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. घरांवर कारवाई होणार हे माहीत असतानादेखील घरांवर बुलडोझर फिरताना घरमालकांना विशेष करून महिलांना अश्रू अनावर होत आहेत.

दरम्यान, ज्यांची घरे मोडण्यात आली आहेत, त्यांना भुखंड देण्याचे संबंधित जमीनदारांनी मान्य केले आहे. तर दुसऱ्या बाजूने सरकारने घरांचा मोबदला वाढवून द्यावा. अशी मागणी पिडीत घरमालकांनी आपली कैफियत मांडताना केली आहे.

Bicholim
गिरीष चोडणकरांचा गाडेधारकांच्या उपोषणाला पाठींबा

घरांविरोधात कारवाई

राज्य महामार्गा अंतर्गत येणाऱ्या बगलमार्गाच्या कामात अडथळा ठरणारी डिचोलीतील पिराचीकोंड-वाठादेव भागातील 18 घरे हटविण्याचे काम बांधकाम हटाव पथकाने बुधवारी हाती घेताना त्यादिवशी दोन घरांसह तीन बांधकामे पाडण्यात आली. या घरां विरोधातील गुरुवारी बंद ठेवण्यात आलेली कारवाई पुन्हा पोलिस बंदोबस्तात सुरु करण्यात आली आहे. कारवाईवेळी भू-संपादन खात्याचे अधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम आणि अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित राहत आहेत. तर डिचोलीच्या संयुक्त मामलेदार अपूर्वा कर्पे या कायदा व्यवस्थेवर नियंत्रण ठेवून आहेत. घरे मोडणार याची कल्पना असल्याने बहूतेक घरमालकांनी कारवाईपूर्वीच घरे खाली केली होती.

भरपाईत वाढ करा

आमदार प्रवीण झांट्ये यांच्या पुढाकारातून आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या शिष्टाईमुळे जमीनदार आम्हाला अन्यत्र भुखंड देण्यास तयार आहेत. असे वसंत होसमणी आणि अन्य घरमालकांनी सांगून आमदार झांट्ये आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना धन्यवाद दिले. घरांच्या मोबदल्यापोटी सरकारकडून मिळणारी रक्कम वाढवून द्यावी. अशी मागणी या घरमालकांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com