गिरीष चोडणकरांचा गाडेधारकांच्या उपोषणाला पाठींबा

‘गोमेकॉ’ इस्पितळाबाहेरील गाडेधारकांच्या उपोषणाकडे आमदाराची पाठ
गिरीष चोडणकरांचा गाडेधारकांच्या उपोषणाला पाठींबा
गिरीष चोडणकरांचा गाडेधारकांच्या उपोषणाला पाठींबा Dainik Gomantak

पणजी: बांबोळी (bambolim) येथील ‘गोमेकॉ’ (GMCH) इस्पितळाबाहेर गाडेधारकांनी त्यांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या साखळी उपोषणाला आठवडा होत आला, तरी स्थानिक आमदार टोनी रॉड्रिग्ज हे त्या ठिकाणी फिरकलेही नाहीत. त्‍यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सांत आंद्रेचे भाजप नेते रामराव वाघ यांनी काल गाडेधारकांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त केला. आणि आज गोवा कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीष चोडणकर (girish chodankar) यांनी सुद्धा गाडेधारकांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

गिरीष चोडणकरांचा गाडेधारकांच्या उपोषणाला पाठींबा
भरपावसात प्लास्टिक डोक्यावर घेऊन बांबोळीत गाडेधारकांचे उपोषण

गाडेधारक अंधारातच

काल सकाळपासून ‘गोमेकॉ’ इस्पितळ संरक्षक भिंत पाडण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, त्या ठिकाणी या गाडेधारकांचे पुनर्वसन करणार की आणखी काही केले जाणार आहे, याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. ज्या खात्यामार्फत हे काम सुरू करण्यात आले आहे, त्याचे अधिकारी या ठिकाणी नाहीत. हे काम एका कंत्राटदाराला दिले गेले आहे. मात्र, त्याला तेथील जागेचे सपाटीकरणाचे काम दिले गेले आहे. त्यामुळे सध्या गाडेधारक अंधारातच आहेत. जोपर्यंत ठोस आश्‍वासन व पुनर्वसनाचा आराखडा दाखवण्यात येत नाही, तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू ठेवले जाईल, अशी माहिती उपोषणकर्त्यांनी दिली.

सरकारने आश्‍वासनपूर्ती करावी : रामराव वाघ

सांत आंद्रेचे नेते रामराव वाघ यांनी काल दुपारी साखळी उपोषणच्या ठिकाणी येऊन त्यांना पाठिंबा देण्याबरोबरच त्यांच्या लढ्यामध्ये त्यांच्यासोबत राहण्याचे आश्‍वासन दिले. ज्यावेळी फळ-भाजी विक्रेत्यांना तसेच गाडेधारकांचे गाडे जमीनदोस्त करण्यात आले तेव्हा त्या कारवाईला विरोध करण्यासाठी वाघ यांनी धाव घेतली होती. या विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी मागणी केली होती. स्थानिक आमदार टोनी फर्नांडिस व आमदार फ्रान्‍सिस सिल्वेरा हे साखळी उपोषण सुरू झाल्यापासून आजपर्यंत तेथे आलेच नाही. सरकारने दिलेले आश्‍वासन पूर्ण न केल्यास गाडेधारकांच्या लढ्यात सहभागी होऊ. तसेच गरज पडल्यास त्यांच्याबरोबर उपोषणास बसू, असे आश्‍वासन दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com