Mapusa News : ‘लाडली लक्ष्मी’च्या प्रलंबित अर्जांसह भेटा! कार्लुस फेरेरा

Mapusa News : प्रलंबित अर्जांचा मुद्दा आपण विधानसभेत उपस्थित केला होता, त्यामुळे मंजुरीचे आदेश देण्यात आल्याचे फेरेरा यांनी सांगितले.
Mla Carlos Ferreira
Mla Carlos FerreiraDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa News :

म्हापसा, लाडली लक्ष्मीचे अर्ज प्रलंबित असल्यास किंवा फेटाळण्यात आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी मतदारांना केले.

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. खोर्जुवे येथे २२ लाभार्थ्यांना लाडली लक्ष्मी मंजुरी पत्रांचे वाटप केल्यानंतर ते बोलत होते.

प्रलंबित अर्जांचा मुद्दा आपण विधानसभेत उपस्थित केला होता, त्यामुळे मंजुरीचे आदेश देण्यात आल्याचे फेरेरा यांनी सांगितले. ज्यांचे अर्ज फेटाळले आहेत, त्यांची कागदपत्रे अपुरी असू शकतात. यासारख्या बाबींवर

मात करण्यासाठी आपली टीम गरजवंतांना मदत करेल, असेही आमदार म्हणाले.

Mla Carlos Ferreira
Goa News : साकोर्ड्यात पाणीप्रश्न पेटला; दूषित पाणीपुरवठा

ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांनी आपले अर्ज मंजूर करून घ्यावेत, अशी माझी इच्छा आहे. सुमारे ४ वर्षांचा विलंब होता कामा नये. अनेक अर्जदारांचे लग्न झाले असून त्यांना आता मुलेही झाली आहेत. काही प्रलंबित अर्ज असल्यास कृपया कळवा. मी अधिकाऱ्यांशी बोलणी करेन, असेही फेरेरा यांनी सांगितले.

मंत्र्यांशी संपर्क साधून समस्या सोडवू

१जे अर्ज अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. तसेच जे अर्ज फेटाळले आहेत. त्यांच्या कारणांचा तपशील मी मागितला होता. मिळालेल्या माहितीनुसार अर्ज फेटाळण्याच्या काही कारणांमध्ये वेळेत अर्ज सादर न करणे हेदेखील आहे. आम्ही मंत्र्यांना पत्र लिहून आमचे कारण समजावून सांगू शकतो आणि आमचा अर्ज स्वीकारण्यास सांगू शकतो.

२ अर्ज फेटाळल्यानंतर संधी नाही असा विचार करून घरी बसू नका. जे अर्ज प्रलंबित आहेत, त्यांचीही मी अधिक चौकशी करणार आहे, जेणेकरून ते लवकर मार्गी लागतील. मी तुमच्या मदतीसाठी आहे. मी तुमचा आणि सरकारचा मध्यस्थ आहे, जेणेकरून मी तुम्हाला मदत करू शकेन, असे आवाहन आमदार फेरेरा यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com