Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांना विलंब

प्रवाशांचे हाल ः सलग दोन दिवस मेगा ब्लॉकचा परिणाम
Konkan Railway
Konkan RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

Konkan Railway : कोकण रेल्वेमार्गावर मेगा ब्लॉकमळे गाड्यांना विलंब झाला. अनेक गाड्या उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. ११ रेल्वेगाड्या विलंबाने धावल्याने प्रवाशांच्या मनस्तापात भर पडली.

नागपूर-मडगाव स्पेशल तब्बल ६ तास, मंगला एक्स्प्रेस २ तास ४८ मिनिटे, तर करमळी-एलटीटी वातानुकुलित सुपरफास्ट स्पेशलही ३ तास ५१ मिनिटे उशिरानेच मार्गस्थ झाली. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होण्यामागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

मात्र कोकण मार्गावर सलग २ दिवस झालेल्या मेगाब्लॉकमुळे वेळापत्रकावर परिणाम झाला. ०११३९ क्रमांकाची नागपूर-मडगाव स्पेशल तब्बल ६ तास १९ मिनिटे विलंबानेच धावल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.

०९०५७ क्रमांकाची उधना-मंगळूर स्पेशल २ तास ३६ मिनिटे तर १०१०३ क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस १ तास ५५ मिनिटे उशिराने रवाना झाली.

१०१०५ क्रमांकाची दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस १ तास ३१ मिनिटे तर १०१०६ क्रमांकाची सावंतवाडी-दिवा पॅसेंजर १ तास ३० मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली. १२०५२ क्रमांकाची मडगाव- सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेसही ५७ मिनिटे विलंबानेच धावली.

Konkan Railway
Goa Accidental Death: कुडचडेत दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू; इतर दोघे गंभीर जखमी

बिघडलेले वेळापत्रक

१२६१८ क्रमांकाची निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस २ तास ४८ मिनिटे तर २६२० क्रमांकाची मत्स्यगंधा एक्सप्रेस १ तास उशिराने धावली.

या पाठोपाठ २२११४ क्रमांकाची कोच्युवेली-एलटीटी स्पेशल १ तास तर २२११६ क्रमांकाची करमाळी-एलटीटी वातानुकूलित स्पेशल ३ तास ५१ मिनिटे विलंबाने धावल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

२२११९ क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस ४५ मिनिटे, तर २२९०८ क्रमांकाची हापा-मडगाव एक्स्प्रेसही १ तास ९ मिनिटे उशिराने रवाना झाली. बिघडलेल्या वेळापत्रकाचा अनेक प्रवाशांना फटका बसत आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com