Konkan Railway : फुकट्या प्रवाशांकडून २१.१८ कोटींचा महसूल; कोकण रेल्वेला फायदा

Konkan Railway : २० प्रमुख तिकीट तपासनिसांचा गौरव; तिकीट तपासनिसांचे काम अधिक कार्यक्षम व्हावे, त्यांनी दक्ष राहावे यासाठी कोकण रेल्वेतर्फे त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे यावेळी सांगण्यात आले.
Konkan Railway
Konkan RailwayDainik Gomantak

Konkan Railway :

सासष्टी, २०२३-२४ या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेला तिकीट तपासणीतून २१.१८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

या संपूर्ण वर्षात ३,९९० वेळा तिकीट तपासणीच्या मोहिमा पूर्ण करण्यात आल्या व त्यात ७८,११५ प्रवाशी विनातिकीट प्रवास करताना आढळले व त्यांच्याकडून दंड वसूल करून घेण्यात आला. या मोहिमेतून कोकण रेल्वेच्या तिकीट तपासनिसांची कार्यक्षमता सिद्ध झाली व त्यामुळे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने २० प्रमुख तिकीट तपासनिसांचा गौरव केला. त्यांना प्रशंसा प्रमाणपत्र व रोख बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी कोकण रेल्वेचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा उपस्थित होते.

Konkan Railway
Goa Politics: कला अकादमी, मंत्री गावडेंच्या राजीनाम्यांचा प्रश्न विचारताच CM सावंतांनी पत्रकार परिषदच गुंडाळली

सुविधा दिल्या जातील

तिकीट तपासनिसांचे काम अधिक कार्यक्षम व्हावे, त्यांनी दक्ष राहावे यासाठी कोकण रेल्वेतर्फे त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे यावेळी सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com