Goa News: गोव्यात 'काटेकणगीला' पसंती! 88 हेक्टरमध्‍ये लागवड; तिसवाडीत सर्वाधिक उत्पादन

Goa Agricultural News: राज्यामध्ये पावसाळ्यात भात, नाचणी, तसेच विविध भाज्यांच्या पिकासहित कणगी आणि करांदे, रताळी लागवडही प्रमाणात केली जाते. कणगीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने काही शेतकरी केवळ काटेकणगी उत्पादन घेतात.

Katekanagi Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Katekanagi Production

पणजी: राज्यामध्ये पावसाळ्यात भात, नाचणी, तसेच विविध भाज्यांच्या पिकासहित कणगी आणि करांदे, रताळी लागवडही प्रमाणात केली जाते. कणगीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने काही शेतकरी केवळ काटेकणगी उत्पादन घेतात.

तिसवाडी, सत्तरी, सांगे, फोंडा, डिचोली आदी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यात २०२३-२४ या काळात एकूण ८८ हेक्टर क्षेत्रफळात यंदा काटेकणगी आणि इतर रताळी आदींची लागवड करण्यात आली तर एकूण २७५ टनाचे उत्पादन घेण्यात आले. राज्यातील धारबांदोडा वगळता सर्वच तालुक्यात यंदा कमी अधिक प्रमाणात काटेकणगीची लागवड करण्यात आली आहे.

Goa Agricultural News: राज्यामध्ये पावसाळ्यात भात, नाचणी, तसेच विविध भाज्यांच्या पिकासहित कणगी आणि करांदे, रताळी लागवडही प्रमाणात केली जाते. कणगीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने काही शेतकरी केवळ काटेकणगी उत्पादन घेतात.
Goa Drugs Case: पोलिसांच्या सापळ्यात अडकला ड्रग्ज विक्रेता! साडेसहा लाखांचे चरस हस्तगत; झारखंडच्या तरुणास अटक

राज्यात सर्वाधिक काटेकणगी, रताळी लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्रफळ हे तिसवाडी तालुक्यातील असून येथे एकूण ३५ हेक्टर क्षेत्रफळात काटेकणगीची लागवड केली जाते. जी एकूण दक्षिण गोवा जिल्‍ह्याच्या लावडीखालील क्षेत्रापेक्षा एक हेक्टरने अधिक आहे. तिसवाडी तालुक्यात एकूण ९९ टन उत्पादन घेण्यात येते जे इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

दरम्‍यान, काटेकणगी हे पौष्‍टिक कंदमूळ असल्‍याने बाजारात त्‍यांना मोठी मागणी आहेे. दिवसेंदिवस त्‍यांचा दरही वाढत चालला आहे. मात्र लोक ही कंदमुळे खरेदी करतातच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com