Pernem News : सर्व पतसंस्थांनी अंत्योदय तत्त्वावर पतपुरवठा करावा : मंत्री श्रीपाद नाईक

‘कपिला मल्टीपर्पज’च्या पेडणे शाखेचे उद्‌घाटन
Shripad Naik
Shripad Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

Pernem News : पेडणे,  सहकारातून प्रत्येक क्षेत्राची समृद्धी शक्य असल्याने पतसंस्थांनी आर्थिक दुर्बल घटकांना अंत्योदय तत्वावर पत पुरवठा करायला हवा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक यांनी केले.

पेडणेत कदंबा बस स्थानकातील  आस्थापनात कपिला मल्टीपर्पज सोसायटीच्या पेडणे शाखेचे उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी खास निमंत्रित म्हणून पेडणे नगराध्यक्ष  सिद्धेश पेडणेकर, उपनगराध्यक्ष  आश्विनी पालयेकर, नगरसेविका विशाखा गडेकर ,कपिला मल्टीपर्पजचे चेअरमन तथा माजी मुख्यमंत्री प्रा लक्ष्मीकांत पार्सेकर,

व्हा.चेअरमन रमेश शेट मांद्रेकर, संचालक अरुण बानकर,  भिवा तिळवे,  विष्णू परब, सदगुरु नाईक, स्मिता पार्सेकर, विलासिनी नाईक , बॅंकेचे निवृत्त व्यवस्थापक लुईस फर्नांडिस  ,संजीव गावकर आदी उपस्थित होते.

श्रीपाद नाईक पुढे म्हणाले की, सहकार हे असे क्षेत्र आहे जे शिक्षण, समाज, व्यापार राजकारण , क्रीडा या सारख्या विविध क्षेत्रांना एक सूत्रात बांधते. त्यामुळे सहकाराच्या तत्वावर विकास केल्यास समाजाच्या प्रत्येक घटकाचा पर्यायाने  देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार तत्वाचा योग्य वापर करायला हवा.

पेडणे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर म्हणाले की, राजकारणात मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारलेल्या पार्सेकर सरांनी आपल्या मातीशी असलेली नाळ शिक्षण आणि सहकाराच्या माध्यमातून टिकवून ठेवली  आहे.

शिक्षण क्षेत्राबरोबरच त्यांनी सहकारात आमुलाग्र क्रांती करावी. समाजातील सर्व घटकांचा विकास करावा. आपल्या प्रास्ताविक भाषणात चेअरमन प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले हरमल येथे सुरु झालेल्या कपिला मल्टीपर्पज सोसायटीच्या मांद्रे, मोरजी,व तुये या मांद्रे मतदार संघात शाखा होत्या. विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघन करून तालुक्याच्या पेडणे शहरात पदार्पण केले आहे.

सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी   संगीत शिक्षक दशरथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली  स्वागत गीत सादर केले. जिग्नेश नाईक,मकरंद परब यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन स्मिता पार्सेकर यांनी केले. संचालक अरुण बानकर  यांनी आभार मानले.

Shripad Naik
Goa Shack: काळजी नको, शॅकना परवाने मिळणारच

कपिला मल्टीपर्पजच्या माध्यमातून समाजतील आर्थिक दुर्बल घटकांना पत पुरवठा करण्याबरोबरच नारळ, सुपारी उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनाची खरेदी विक्री हाती घेतली जाईल.

त्यासाठी पेडणे  औद्योगिक वसाहतीत तसेंच  पेडणे कदंबा बसस्थानकात गाळे घेतले आहेत. लवकरच हा व्यवसाय सुरु करण्यात येईल.

-प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर, चेअरमन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com