'Kalas Kund' waterfall: 'या' कारणास्तव पर्यटकांसाठी 'कळसकोंड’ धबधबा बंद, स्थानिकांचाही निर्णयाला पाठिंबा

पावित्र्य जपण्याच्या उद्देशाने देवस्थानचा निर्णय
'Kalas Kund' waterfall
'Kalas Kund' waterfallDainik Gomantak
Published on
Updated on

'Kalas Kund' waterfall धार्मिक महत्व असलेल्या डिचोली तालुक्यातील लाडफे येथील ‘कळसकोंड’ धबधब्यावर यंदाही पर्यटकांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसा निर्णयही श्री सातेरी केळबाई देवस्थान समितीने घेतला आहे.

मॉन्सून सक्रिय झाल्याने या धबधब्यावर पर्यटकांची वर्दळ सुरू होण्याची शक्यता गृहित धरून रविवारी (ता.२५) या धबधब्याकडे जाणारी वाट अडविण्यात आली आहे.

‘कळसकोंड’ परिसराचे धार्मिक पावित्र्य जपण्यासाठी देवस्थान समितीने यंदाही या धबधब्यावर पर्यटकांना प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला आहे.

समितीचे अध्यक्ष विष्णू मळीक यांच्या नेतृत्त्वाखाली सचिव प्रमोद मळीक, सुरज मळीक, आत्माराम मळीक, यशवंत मळीक, नितीन मळीक, संजीव मळीक, सर्वेश मळीक आणि इतरांनी एकत्रित येऊन धबधब्याकडे जाणारी वाट अडविली.

पावसाळा सुरू झाला की, विविध भागात धबधब्यांचा खळखळाट सुरू होतो. काही धबधब्यांवर पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी उसळते.

लाडफे येथील ‘कळसकोंड’ धबधबा घसघसू लागला, की हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करू लागतो.

पावसाळी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी विविध भागातून अनेकजण या धबधब्यावर येतात. मद्यप्राशन करुन धिंगाणा घालण्याचे प्रकारही यापूर्वी या धबधबा परिसरात घडले आहेत.

'Kalas Kund' waterfall
म्हादई नदीच्या पात्रात बुडालेल्या युवकाचा अखेर मृतदेह सापडला

काही वर्षांपूर्वी बालक बुडाल्याची घटना

काही वर्षांपूर्वी तेथील चिरेखाणीत बुडून एका बालकाचा दुर्दैवी अंत झाला होता. या साऱ्या प्रकारावर नियंत्रण यावे. धार्मिक परिसराचे पावित्र्य रहावे. या हेतूने या धबधब्यावर पावसाळी पर्यटनाला प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीने दिली आहे.

प्रतिबंध असतानाही या धबधब्यावर येऊन कोणी अरेरावी केल्यास त्यांच्यावर प्रसंगी कारवाई करण्यात येईल, असे देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे.

ज्याठिकाणी ‘कळसकोंड’ धबधबा वाहतो, त्या परिसराला मोठे धार्मिक महत्व आहे. त्याठिकाणी देवतांच्या मूर्ती विसर्जित केल्या आहेत. गावात साजरा होणाऱ्या कळसोत्सवावेळी कळसकोंड तळीचे पाणी पवित्र तीर्थ मानून घरोघरी देण्यात येते.

-विष्णू मळीक, अध्यक्ष, देवस्थान समिती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com