Kala Academy Slab Collapsed: मुख्यमंत्र्यांसह, गोविंद गावडे यांनीही राजीनामा द्यावा : आलेमाव

कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया, न्यायालयीन चौकशी करा
Kala Academy | Yuri Alemao
Kala Academy | Yuri AlemaoDainik Gomantak

Kala Academy Slab Collapsed : कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना धारेवर धरले. नैतिकतेनुसार दोघांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. संध्याकाळी आलेमाव यांनी कॉंग्रेसच्या इतर आमदारांसोबत कला अकादमीची पाहणी केली.

आलेमाव म्हणाले, कला अकादमीची रचना चार्ल्स कुर्रैय्या यांनी केली होती, जिथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांनी सादरीकरण केले आहे. पण आता असंवेदनशील आणि मिशन टोटल कमिशन सरकारच्या काळात ते भ्रष्टाचाराचे स्मारक बनले आहे.

कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामात भ्रष्टाचार करण्यासाठी कंत्राटदार निविदा प्रक्रिया न करता नेमला आहे. हा प्रकार केंद्रिय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियमावलीच्या विरुद्ध आहे.

भाजप सरकारने या नूतनीकरणात भ्रष्टाचार केला आहे, असे आम्ही आधीच सांगितले आहे. आता खुल्या रंगमंचवरील कोट्यवधींचा खर्च करूनही कोसळले आहे.

त्यामुळे कोट्यवधी रुपयाचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मी मागणी करतो, असे ते म्हणाले.

Kala Academy | Yuri Alemao
Goa Crime: मेरशीत पुन्हा गँगवॉर; ‘हिस्ट्रीशीटर’चा खून

या कामात झालेल्या भ्रष्टाचाराला मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे जबाबदार आहेत. मी म्हणेन की संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार आहे, कारण त्यांनी निविदा न काढताच नूतनीकरणाला मंजुरी दिली.

भ्रष्टाचार करण्यासाठी एका कंपनीला काम देण्यात आले. त्यामुळे या गोंधळावर आता कोणताही विभाग स्पष्टीकरण द्यायला तयार नाही, असे आलेमाव म्हणाले.

ओव्हर स्मार्ट मंत्री!

या नूतनीकरणासाठी सरकारी तिजोरीतील निधी वापरला जातो, जो सार्वजनिक पैसा आहे. त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही, तर विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार आहोत.

Kala Academy | Yuri Alemao
Goa Forest Officer Missing: उसगाव रेंज फॉरेस्ट अधिकारी बेपत्ता; मिरामार परिसरात आढळली कार

पोलिस तक्रार दाखल करण्याची मागणी कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळण्याच्या स्थितीला भाजप सरकारातील ‘ओव्हर स्मार्ट’ मंत्री जबाबदार असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीने केला आहे आणि संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांच्या निष्काळजीपणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

फाऊंडेशनच्या सूचना नाकारल्या!

काँग्रेसचे उपाध्यक्ष तुलिओ डिसोझा, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. श्रीनिवास खलप व विरियतो फर्नांडिस यांनी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकाराच्या भ्रष्ट कृत्यावर टीका केली. सरकारने चार्ल्स कुर्रय्या फाउंडेशनच्या सूचना नाकारल्या.

ते फाउंडेशन सरकारला मदत करणार होते. तरीही त्यांचे काहीच एकून घेतले नाही. आज कला अकादमीचा भाग कोसळला कारण मंत्री स्वताला ’ओव्हर स्मार्ट’ समजत आहेत, अशी टीका या नेत्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com