Sasashti News : ‘कदंब’तर्फे वाहतुकीचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न

Sasashti News : ‘ईव्ही’ बसगाड्यांसाठी सरकारकडून मान्यता : नेटो
Sasashti
Sasashti Dainik Gomantak

Sasashti News :

सासष्टी, कदंब महामंडळातर्फे आपल्या वाहतुकीचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न सुरू केला असून महामंडळ आपल्या बस ताफ्यात ‘ईव्ही’ बसगाड्यांची संख्या वाढवणार आहे. कदंबकडे सध्या जास्तीत जास्त डिझेलवर चालणाऱ्या बसगाड्या आहेत.

महामंडळाने सरकारला यासंदर्भात प्रस्ताव दिला व ईव्ही बसगाड्यांसाठी सरकारने मान्यता दिल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरेक परेरा नेटो यांनी सांगितले आहे.

सध्या कदंबकडे असलेल्या ५० टक्के बसगाड्या पुष्कळ जुन्या आहेत. जूनच्या अखेरीस दहा ईव्ही बसगाड्या महामंडळाच्या ताफ्यात जमा होतील व ऑगस्टपर्यंत आणखी ५० ईव्ही बसगाड्या घेतल्या जातील.

Sasashti
Goa Crime News: नवजात अर्भकाचे आढळले फक्त पाय, शरीर गायब; डोंगरी-मंडूर परिसरात खळबळ

यंदा सरकारने वाहतूक क्षेत्रासाठी ३०६ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातून ईव्ही बसगाड्यांची वाढ करण्यात येणार आहे. आंतरराज्य मार्गावर ५० ईव्ही बसगाड्या सुरू केल्या जातील. या ५० गाड्यांमुळे ताफ्यात वाढ होईल, असे नेटो यांनी सांगितले.

५३ बसगाड्या

सार्वजनिक वाहतूक सुरळीत करण्यासाठी ‘म्हाजी बस’ योजना सर्व गोवाभर सुरू करण्याचा निर्धार महामंडळाचा आहे. या योजनेमुळे प्रवशांची चांगली सोय होत आहे व तसे आम्ही सरकारला अहवालातून सांगितले आहे.

ही योजना ऑगस्ट २०२३मध्ये सुरू केली होती. सुरवातीला सहा महिन्यांसाठी व नंतर मुदत वाढविली होती. सध्या या योजनेखाली ५३ बसगाड्या कार्यरत आहेत, अशी माहिती डेरेक नेटो यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com