Goa Forward Party: गोवा फॉरवर्डतर्फे डिचोलीत ‘जनता दरबार!

Bicholim Janata Darbar: जनतेने उपस्थित राहून आपले प्रश्‍‍न आणि समस्या मांडाव्यात असे पक्षातर्फे आवाहन
Bicholim Janata Darbar: जनतेने उपस्थित राहून आपले प्रश्‍‍न आणि समस्या मांडाव्यात असे पक्षातर्फे आवाहन
MLA Vijai Sardesai Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा फॉरवर्डतर्फे येत्या बुधवारी १० जुलैला ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई उपस्थित राहून डिचोलीसह सत्तरी तालुक्यातील जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेणार आहेत, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष संतोषकुमार सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पक्षाचे गटाध्यक्ष वीरेंद्र पत्रे, उपाध्यक्ष श्रीकृष्ण हळदणकर, विठ्ठल सावंत, सचिव आपा साळगावकर उपस्थित होते. डिचोली येथील हिरा टॉकीज संकुलातील सेलिब्रेशन बंक्केट हॉलमध्ये सकाळी १०.३० वाजता हा ‘जनता दरबार’ भरणार आहे.

दरम्‍यान, आतापर्यंत मडगाव आणि वास्‍कोत भरविण्यात आलेल्या ‘जनता दरबार’ला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, असेही सावंत यांनी सांगितले. डिचोलीसह सत्तरी तालुक्यातील जनतेने ‘जनते दरबार’ला उपस्थित राहून आपले प्रश्‍‍न आणि समस्या मांडाव्यात, असे आवाहन त्‍यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com