International Yoga Day : योगामुळे बुद्धीचा विकास : डॉ. चंद्रकांत शेट्ये

International Yoga Day : डिचोलीत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात
International Yoga Day
International Yoga Day Dainik Gomantak
Published on
Updated on

International Yoga Day :

डिचोली, योग ही पुरातन कला असून या कलेला भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. ''योगा'' केल्याने मानसिक ताणतणाव दूर होतानाच, शारीरिक थकवा दूर होऊन आरोग्य तंदुरुस्त राहते.

त्याचबरोबर बुद्धीचा विकास होऊन ती तल्लख बनते, असे मत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी व्यक्त केले.

डिचोली लायन्स क्लबच्या सहकार्याने पतंजली योग समितीतर्फे डिचोलीत आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पहाटे हिराबाई झांट्ये स्मृती सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. शेट्ये प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. त्यांच्याच हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

International Yoga Day
South Goa: संविधानविरोधी वक्तव्य करणारे विरियातो निवडून येणे हे लोकशाहीचे अपयश - हिंदू जनजागृती समिती

यावेळी नगराध्यक्ष कुंदन फळारी, डॉ. सुबोध कांसार, नगरसेवक नीलेश टोपले,योग शिक्षक बाळकृष्ण नाईक, अश्विनी पटवर्धन, भारतेश गुळणवार आदी उपस्थित होते.

योग प्रात्यक्षिके :

उद्धव कशाळीकर आणि अन्य योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग साधकांकडून प्राणायाम आदी विविध योगासनांची प्रात्यक्षिके करण्यात आली. आमदार डॉ. शेट्ये यांच्यासह कुंदन फळारी आदी साधक योग प्रात्यक्षिकात सहभागी झाले होते. सूर्यकांत देसाई यांच्यासह ज्येष्ठ साधकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साधकांनी प्राणायाम आदी योगासने केली. कार्यक्रमस्थळी हवन करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com