Weather Update: गोव्यासह देशातील विविध राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Rain Alert, Weather Update: देशाच्या अनेक भागात परतीच्या मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे.
Weather Update
Weather UpdateDainik Gomantak

Rain Alert, Weather Update: देशाच्या अनेक भागात परतीच्या मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. तथापि, पूर्व भारतात 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर म्हणजेच चार दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. याशिवाय आज आणि उद्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडेल.

पूर्व भारताबद्दल बोलताना हवामान खात्याने सांगितले की, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहारमध्ये 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत मुसळधार पाऊस पडणार आहे.

याशिवाय पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशामध्ये 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर, 1 ते 3 ऑक्टोबर आणि अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस पडेल. पश्चिम भारताबद्दल बोलायचे झाल्यास, कोकण, गोवा (Goa) आणि मध्य महाराष्ट्रात 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस पडेल.

Weather Update
Goa Weather Update: राज्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस; मॉन्सूनचा सुधारित अंदाज

याशिवाय दक्षिण भारताबद्दल बोलायचे झाल्यास, 30 सप्टेंबरला तामिळनाडू, इंटीरियर कर्नाटक, 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला कोस्टल कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस पडेल.

मध्य भारताबद्दल बोलायचे झाल्यास, छत्तीसगडमध्ये 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, पूर्व मध्य प्रदेशात 1 आणि 2 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे. याशिवाय ईशान्य भारतात आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 30 सप्टेंबर आणि अरुणाचल प्रदेशात 3 आणि 4 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस पडेल.

त्याचबरोबर, केरळमध्ये (Kerala) सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने आज केरळमधील तिरुअनंतपुरम, अलाप्पुझा, कोल्लम आणि पठ्ठनथिट्टा या चार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Weather Update
Weather Update : अरबी समुद्रात उद्या चक्रीवादळाची शक्यता; गोव्यावरही होऊ शकतो परिणाम

ओडिशा : मुसळधार पावसाची शक्यता

त्याचवेळी, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर भारतीय हवामान विभागाने (IMD) ओडिशात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी केली आहे.

आयएमडीने म्हटले आहे की, हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या ईशान्य आणि लगतच्या पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर आहे. विभागानुसार, पुढील 48 तासांत हे क्षेत्र उत्तर ओडिशा आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनार्‍याकडे सरकेल.

ओडिशामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, ज्यामुळे सखल भागात पाणी साचू शकते, काही ठिकाणी पूर आणि भूस्खलन होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com