Illegal Construction: लोकप्रतिनिधींकडून बेकायदा बांधकाम: बर्डे

Illegal Construction: गिरी पंचायत क्षेत्रातील शेत जमिनीचे बेकायदा रूपांतर व तिथे केलेल्या अनधिकृत बांधकामाची दखल प्रशासनाने घेतली आहे.
Goa Illegal Building Construction
Goa Illegal Building ConstructionDainik Gomantak

Illegal Construction: गिरी पंचायत क्षेत्रातील शेत जमिनीचे बेकायदा रूपांतर व तिथे केलेल्या अनधिकृत बांधकामाची दखल प्रशासनाने घेतली आहे. हे बांधकाम उत्तर गोव्यातील एका सत्ताधारी आमदाराने केले आहे.

Goa Illegal Building Construction
CM Pramod Sawant: ‘लोकोत्सव’ चालतो अंत्योदय, ग्रामोदय तत्त्वावर !

उपलब्ध माहितीनुसार काँग्रेस नेते संजय बर्डे यांनी उत्तर गोव्यातील एका आमदाराविरुद्ध गिरी येथील सर्व्हे क्र. 5/2 मध्ये वैध परवानगी न घेता शेत जमिनीत बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी लेखी तक्रार दाखल केली आहे.

बर्डे यांनी बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गिरीतील कृषी क्षेत्र सर्वेक्षण क्र. 5/2 मध्ये कथित बंगल्याचे बेकायदा बांधकाम केले असून यासाठी नगर नियोजन व पंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही.

बर्डे यांनी महसूल विभाग, मुख्य सचिव, उपजिल्हाधिकारी, बार्देश गटविकास अधिकारी, बार्देश मामलेदार व इतरांकडे तक्रारी करून आवश्यक कारवाईची मागणी केली आहे. त्यानुसार, बार्देश मामलेदार कार्यालयाने पाहणी केली व चेक लिस्ट करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पंचायतीला दिले होते.

त्यानंतर, स्थानिक तलाठ्यांनी पाहणी करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर केला. याशिवाय उपनगर नियोजक अधिकाऱ्यांनी पंचायत राज कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्यासाठी गिरीचे सरपंच व सचिव यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर, पंचायतीनेही दखल घेत नोटीस बजावली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com