'मोदी देश चालवू शकतात तर मनोज परब का नाही? त्यांच्यात PM होण्याची क्षमता', रुबर्ट परेरा यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात विविध राजकीय पक्षांच्या वेगाने हालचाली सुरु आहेत.
Manoj Parab And Rubert Pereira
Manoj Parab And Rubert Pereira Dainik Gomantak

Goa Loksabha Election 2024: मनोज परब यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. नरेंद्र मोदी देश चालवू शकतात तर परब का नाही, असे वक्तव्य आरजीचे दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार रुबर्ट परेरा यांनी केले आहे.

रुबर्ट परेरा यांनी एका डिजिटल माध्यमावर दिलेल्या मुलाखतीत याबाबत वक्तव्य केले आहे. "मनोज परब यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. संसदेच्या निवडणुकीनंतर ते पंतप्रधानही होऊ शकतात, ते देश सहज सांभाळू शकतात. मोदी देश चालवू शकतात तर मनोज का नाही?" असा विश्वास आरजीचे दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार रुबर्ट परेरा यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात विविध राजकीय पक्षांच्या वेगाने हालचाली सुरु आहेत. गोव्यातील रिव्हॉल्युशनरी पार्टीच्या वतीने आगामी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून, उमेदवारांची देखील घोषणा करण्यात आली आहे.

आरजीकडून दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी रुबर्ट परेरा उमेदवार असतील तर, उत्तर गोव्यासाठी स्वत: मनोज परब लढणार आहेत.

लोकसभेसाठी आरजी मागील काही दिवसांपासून मोर्चेबांधणी करत आहे. यासाठी त्यांनी लोकांकडून आर्थिक मदतीसाठी मोहिम देखील सुरु केली होती. लोकसभेसाठी पक्षाकडे पुरेसे पैसे नसल्याचे परब यांनी म्हटले होते.

दरम्यान, माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांनी आरजीच्या या मोहिमेवर टीका केलीय. गोवेकर परदेशात काबाडकष्ट करून पैसे कमवत आहेत आणि आरजीचे मनोज परब ह्याच लोकांकडून पक्ष चालविण्यासाठी भिक मागत आहे. ह्या लोकांनी मनोज परबला भिक देण्याचे बंद करावे, असे पोशेको म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com