Kirtan Festival: हैदराबाद महोत्सवात घुमला गोमंतकीय कीर्तनकारांचा नाद

हैदराबाद येथील कीर्तन महोत्सवात गोव्याचे कीर्तनकार सुहास वझेबुवा, चिन्मई कामत, शिवानी वझे यांची बहारदार कीर्तने झाली.
Kirtan Festival |
Kirtan Festival |Dainik Gomantak

Kirtan Festival: हैदराबाद येथील संत श्री केशवस्वामी समितीतर्फे आयोजित सात दिवसीय कीर्तन महोत्सवात नामवंत कीर्तनकारांनी सहभाग घेतला.

गेल्या शनिवारी झालेल्या या महोत्सवात फोंडा येथील कीर्तन विद्यालयाचे अध्यापक कीर्तनकार सुहास वझेबुवा, चिन्मई कामत, शिवानी वझे यांची बहारदार कीर्तने झाली.

गोव्यातील कीर्तनकारांना या कीर्तन महोत्सवात पहिल्यांदाच संधी मिळाली. त्यांना साथसंगत विवेक कयाळ, विनय पाटणकर, दामोदर कामत यांनी उत्तमरीतीने दिली. हैदराबाद येथील या मंडळाचे अध्यक्ष डॉ. रमेश बाबू हैदराबादकर यांनी सर्व कीर्तनकारांना सन्मानित केले.

Kirtan Festival |
Goa Agriculture: मातीत गोडवा पेरणाऱ्या तरुणीची कथा; सेंद्रिय पद्धतीने करते गूळाची निर्मिती

कीर्तन महोत्सवाच्या संयोजिका स्मिता आजेगावकर यांचे मोलाचे सहकार्य कीर्तनकारांना लाभले. दरम्यान, कीर्तन परंपरा जोपासण्यासाठी वझेबुवांनी मोठे कार्य सुरू केले असून सर्व समाजातून कीर्तनकार घडत असल्याने गोवा राज्याचे कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी सुहास वझेबुवा यांचे कौतुक केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com