Valpoi News : होंडा येथे वृक्ष धोकादायक स्थितीत; लोकांत भीती

Valpoi News : वनविभागाने तातडीने झाड हटवण्याची मागणी
Valpoi
Valpoi Dainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi News : वाळपई, होंडा ते वाळपई मुख्य रस्त्यावर एसीजीएल कंपनीला लागून असलेल्या नवनाथ मंदिराच्या समोर भला मोठा जुनाट वृक्ष कोसळण्याच्या स्थितीत उभा आहे. कुठल्याही वेळी कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती परिसरातील लोकांत आहे.

हा वृक्ष कुठल्याही दिशेला कोसळू शकतो, एकतर वाळपई मुख्य रस्त्यावर, नवनाथ मंदिरावर किंवा बाजूला असलेल्या घरावर कोसळून मोठी हानी होऊ शकते. सदर वृक्ष पूर्णपणे पोखरलेला, असल्याने आतमध्ये भली मोठी ढोल तयार झाली आहे.

अशा या स्थितीत हा वृक्ष कुठल्याही वेळी कोसळू शकतो. नवनाथ देवस्थानचे अध्यक्ष रोहिदास सातार्डेकर म्हणाले, वृक्ष कोसळून मोठी दुर्घटना होण्यापेक्षा याचा ताबोडतोब सरकारने बंदोबस्त करावा. जेणेकरून मोठी दुर्घटना होण्यापासून वाचेल, आणि यापासून आजूबाजूच्यांना दिलासा मिळेल.

Valpoi
Goa Petrol-Diesel Price: इंधनाच्या दरात कोणताही बदल नाही! जाणून घ्या गोव्यातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती...

या मुख्य रस्त्यावरून हजारोच्या संख्येने वाहतूक ये जा करतात, तसेच कंपनीचे कामगार वाहनांची वाट पाहत उभे असतात. यापूर्वी आपण पंचायतीला व वनविभागाला पण पत्र पाठविले आहे. पण हा वृक्ष हटवण्यासंबंधी हालचाली अद्याप झालेल्या नाहीत.

- रोहिदास सातार्डेकर, अध्यक्ष नवनाथ देवस्थान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com