Goa Agriculture: शेतीत राबल्यास सरकारी नोकरीहून जास्त उत्पन्न शक्य; साळगावकरांचे आवाहन

Goa Agriculture: पार्से गावात युवा व जाणकार शेतीकडे आपला पूर्वजांचा व्यवसाय सांभाळून शेती करताना दिसतात.
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Agriculture: प्रत्येक सरकारी नोकर नियमित कार्यालयात काम करण्यासाठी किमान आठ तास काम करत असतो. त्याला त्या मोबदल्यात वेतन मिळते. तसेच जर शेतकऱ्यांनी नियमित किमान आठ तास आपल्या शेतात राबून कष्ट केले तर सरकारी वेतनापेक्षा जास्त मिळकत होऊ शकते, असे पार्से येथील प्रगतशील शेतकरी श्रीराम साळगावकर यांनी सांगितले.

पेडणे तालुक्यात एकूण 600 हेक्टर वायंगण शेती असून पार्से भागात 100 हेक्टर क्षेत्रात वायंगण शेती आजही केली जाते. मोठ्या प्रमाणात पार्से गावात युवा व जाणकार शेतीकडे आपला पूर्वजांचा व्यवसाय सांभाळून शेती करताना दिसतात. काही प्रमाणात वायंगण शेती पडिक असल्याचे दिसते, असेही साळगावकर म्हणाले.

साळगावकर यांचा नुकताच ‘आदर्श शेतकरी’ म्हणूनही सत्कार झाला आहे. पूर्वीचा काळ असा होता, की जर आता झाडे लावली तर त्यांची फळे आपल्या नंतर मुलांना, नातवांना मिळतील. परंतु आताचा काळ तसा नाही. तुम्ही झाडे लावा, अन् तुम्हीच फळे खा. बदलत्या काळानुसार शेती केल्यास भरघोस उत्पन्न मिळू शकते, असेही साळगावकर यांनी सांगितले.

Goa Agriculture
Shantadurga Temple Goa: शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण जत्रोत्सवास मोठ्या भक्तीभावाने सुरुवात

साळगावकर यांची 100 एकर जमिनीत काजू बागायत आहे. त्यात केवळ एका जातीच्या नव्हे, तर विविध कलमांद्वारे त्यांनी काजूची लागवड केलेली आहे. दीड किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून त्यांनी डोंगर माळरानावर पाणी बागायतीत पोहचवून विविध प्रकारची शेती, फळझाडे, फुलझाडे फुलवलेली आहेत. 44 वर्षाचा शेती बागायतीचा अनुभव असलेल्या मावळणकर या फकीरफाटा येथील एका शेतकऱ्याकडून आपण शेती विषयक मार्गदर्शन घेतले, असेही त्यांनी सांगितले.

श्रीराम साळगावकर, प्रगतशील शेतकरी-

सरकार शेतीसाठी बी बियाणे, खत, नांगरणीसाठी 50 टक्के अनुदान देते, ते अनुदान नंतरच्या वर्षात मिळते. त्यापेक्षा ते लगेच मिळाले तर गरजू शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. त्यादृष्टीने कृषी खात्याने प्रयत्न करावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com