Goa Liquor Scam: स्वस्त बॉक्समध्ये महागडी दारु, कामगाराने पाच महिने मालकाला गंडवले, 40 लाखांचा गफला

Goa Liquor Scam: महागडे ब्रॅन्डेड मद्य स्वस्त मद्याच्या बॉक्समध्ये भरुन त्याची ओळखीच्या वाईनशॉप मालकाला विक्री केली.
Goa Liquor Scam
Goa Liquor ScamDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Liquor Scam

महागडे ब्रॅन्डेड मद्य स्वस्त मद्याच्या बॉक्समध्ये भरुन त्याची ओळखीच्या वाईनशॉप मालकाला विक्री केली.

मद्य दुकानात कामाला असलेल्या कामागाराने तब्बल पाच महिने मालकाला 40 लाखांचा गंडा घातला. ऑक्टोबर 2022 ते फेब्रुवारी 2023 याकाळात हा प्रकार घडला. याप्रकरणी पणजी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

पणजी पोलिसांनी या प्रकरणात यापूर्वी दोघांना अटक केली होती. दरम्यान, दोघांचीही जामिनावर सुटका करण्यात आली. याप्रकरणात फरार असलेल्या तिसऱ्यांचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाबोकुमारा महाल हा एका मद्याच्या दुकानात काम करत होता. यादरम्यान, त्याने महागड्या मद्याच्या बाटल्या स्वस्त मद्याच्या बॉक्समध्ये भरुन, सौरभ नारुळकर या व्यक्तीला विक्री करत होता. ऑक्टोबर 2022 ते फेब्रुवारी 2023 याकाळात हा प्रकार घडला.

Goa Liquor Scam
Yuri On Bethora Firing: गोव्यात 'गोडसे'च्या अनुयायांचे 'रावणराज्य', बेतोडा गोळीबारावरुन युरींची सरकारवर टीका

पाच महिन्यात तब्बल 40 लाख रुपयांचा गंडा वाईन शॉप मालकाला घालण्यात आला. पोलिसांनी फरार तिसऱ्या संशयिताचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पणजी पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com