'ठोस कृती आराखडा सादर करा', सांडपाणीप्रश्‍नी खंडपीठाची मडगाव पालिका आणि प्रदूषण नियंत्रण बोर्डाला सूचना

यासंदर्भात ठोस कृती आराखडा सादर करण्याची सूचना जनहित याचिकेवरील सुनावणवेळी खंडपीठाने मडगाव पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली आहे.
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

सांडपाणी निचरा जोडणी न घेता नावेली येथील सायपे तळ्यात सांडपाणी सोडणाऱ्या १६९ घरे व आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून वीज व पाणी जोडणी तोडण्याचा आदेश मडगाव पालिकेने दिला आहे. तसेच सुमारे ८८ आस्थापनांनी कन्सेट टू ऑपरेट परवाना घेतलेला नाही, त्यामुळे त्यांनाही ती बंद करण्याचे निर्देश देण्यात येईल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले.

यासंदर्भात ठोस कृती आराखडा सादर करण्याची सूचना जनहित याचिकेवरील सुनावणवेळी खंडपीठाने मडगाव पालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली आहे.

Court
Goa Crime News: फोंड्यात क्रेनने मोटारसायकल पायलटला चिरडले; चालक अटकेत; गरीब कुटुंबाने गमावला आधारस्‍तंभ

आंतोनिओ आल्वारिस यांनी जनहित याचिका सादर करून मडगावातील सांडपाणी निचऱ्यासाठी आवश्‍यक सुविधा नसल्याने हे सांडपाणी तेथील गटारातून सायपे तळ्यात जात असल्याचा दावा केला होता. गोवा खंडपीठाने यासंदर्भात मडगाव पालिकेला सर्वे करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

आतापर्यंत पालिकेने घरे व आस्थापने मिळून ३१७ जणांना कारणेदाखवा नोटिसा बजावल्या होत्या. त्यामध्ये १६५ आस्थापनांना व १५२ घरांचा समावेश होता. त्यातील ४८ जणांनी त्याला उत्तर दिले तर ८७ जणांनी काहीच उत्तर दिले नाही. या ४८ पैकी २ आस्थापनांना सांडपाणी निचरा जोडण्या देण्यात आल्या आहेत तर ६ आस्थापनांनी खड्डे खोदून त्याचा निचरा सुरू केला आहे. सांडपाणी निचरा करण्यासाठी ४० जणांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ज्या ८७ जणांना उत्तर दिले नाही, त्यांचे पाणी व वीज कनेक्शन तोडण्यासाठी आदेश काढण्यात आला आहे.

Court
Goa Todays Update News: स्मार्ट सिटीच्या कामांचा अहवाल हायकोर्टात मांडण्यात आला

पालिकेने १५२ घरांना कारणेदाखवा नोटिसा बजावल्या त्यापैकी ६६ जणांनी उत्तर दिले तर ८६ जणांनी उत्तरच दिलेले नाही. उत्तर दिलेल्या ६६ पैकी ४ जणांनी सांडपाणी निचरा कनेक्शन घेतले आहे तर ६२ जणांना कनेक्शनची व्यवस्था करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. उत्तर न दिलेल्या ८६ जणांपैकी ४ जणांनी सांडपाणी निचरा वाहिनीला कनेक्शन घेतले आहे तर ८२ जणांची वीज व पाणी कनेक्शन तोडण्यासाठी आदेश काढण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com