Summer Health Tips : उन्हाळ्यात ज्येष्ठांनी घ्यावी अधिक काळजी

Summer Health Tips : उन्हाळ्याच्या प्रभावाशी लढण्यासाठी ज्येष्ठांनी त्यांच्या आहारात प्रथिने आणि अँटी-ऑक्सिडंट्सची पूर्तता केली पाहिजे.
Summer Health Tips
Summer Health TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Summer Health Tips :

पणजी, म्हातारपण हे दुसरे बालपण असते. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी ही लहान मुलांप्रमाणेच घ्यायला हवी. उतारवयात थंडी आणि उष्णता सर्वसामान्यांच्या तुलनेत अधिक जाणवते.

ज्येष्ठांना उन्हाळ्यात निर्जलीकरण, पचन समस्या, मूत्रमार्गात संसर्ग इत्यादी अनेक गंभीर आजार होतात. अनेक आजारी ज्येष्ठांची तर अधिक प्रमाणात काळजी घेणे, त्यांना ये-जा करण्यासाठी मदत करणे किंवा कुठेही जाताना ते पडणार नाहीत यासाठी योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

उष्णतेचा सामना करण्यासाठी ज्येष्ठांसाठी सौम्य आहाराचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ज्येष्ठ व्यक्तींनी हे समजून घेतले पाहिजे की, त्यांच्या पोषणाच्या गरजा त्यांच्या वयानुसार बदलतात. उन्हाळ्याच्या प्रभावाशी लढण्यासाठी ज्येष्ठांनी त्यांच्या आहारात प्रथिने आणि अँटी-ऑक्सिडंट्सची पूर्तता केली पाहिजे.

  • दिवसभरात भरपूर पाणी प्या - किमान १५ ग्लास.

  • दिवसाची सुरुवात सूप आणि सॅलडने करा.

  • दररोज ताज्या, घरी शिजवलेल्या अन्नाचे सेवन करा.

  • दररोज लिंबाचा रस घेणे आवश्यक आहे. यामुळे व्हिटॅमिन ‘सी’ मिळते.

  • कार्बोनेटेड पेये, मिठाई, आइस्क्रीम खाणे टाळावे.

  • कॅपिनयुक्त पदार्थ तसेच मद्यपान टाळावे.

  • प्रक्रिया केलेले आणि न शिजवलेले अन्न टाळा.

ज्येष्ठांनी उन्हाळ्यात काय खावे?

उन्हाळ्यात रसाळ आणि जलयुक्त फळे ज्येष्ठांसाठी अधिक उपयुक्त ठरतात जसे की, लिंबू सरबत, कलिंगड, संत्री, मोसंबी, सफरचंद आदी. फळांमुळे रोगप्रतिकारक शक्तिदेखील वाढते. ज्येष्ठांसाठी उन्हाळ्यातील आहारात पालेभाज्या असणे गरजेचे आहे.

अनेक ज्येष्ठ व्यक्तींना मसालेयुक्त पदार्थ अधिक आवडतात; पंरतु अनेक मसाले उष्मा वाढविणारे असतात. त्याउलट जिरे आणि मेथी हे पचनासाठी उपयुक्त असतात तसेच लसूण आणि हळद हे अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

Summer Health Tips
Goa Water Crisis: ''पाणीटंचाईने लोक त्रस्त, मुख्यमंत्री सावंत कर्नाटकात प्रचारात व्यस्त''; काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

प्रथिनयुक्त आहार गरजेचा

ज्येष्ठ नागरिकांना भोजनाच्या वेळेव्यतरिक्त काही खावेशे वाटल्यास काजू, बदाम, शेंगदाणे आदी सुकामेवा खाण्यास द्यावा, जो शक्तिवर्धक आणि आरोग्यदायी ठरताे. ज्येष्ठांसाठी उच्च प्रथिनयुक्त आहार गरजेचा असतो.

प्रत्येक वडीलधाऱ्याने दररोज किमान ०.८ ग्रॅम प्रथिने शरीराच्या वजनासाठी घेतली पाहिजेत. याचा अर्थ ६० किलो वजन असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीने दिवसातून किमान ४८ ग्रॅम प्रथिने खाणे आवश्यक आहे. वृद्धांना त्यांचे वृद्धत्व थांबवण्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com