Harmal News : हरमल भागात पिंपळाचे झाड कलंडले; तीन घरांना धोका

Harmal tree Collaps : तसेच या झाडाची एक फांदी घराला टेकल्याने ग्रामस्थ हरिश्चंद्र हरमलकर यांच्या कुटुंबातील व्यक्तीने अग्निशमन दलाला कळविले.
Harmal News : हरमल भागात पिंपळाचे झाड 
कलंडले; तीन घरांना धोका

हरमल, देऊळवाडा-हरमल भागात हरमलकर यांच्या घरावर धोकादायक पिंपळाचे झाड कलंडल्याने तीन घरांना धोका निर्माण झाला आहे. यावेळी अग्निशमन दलास बेलविले गेले. मात्र, ते झाड न कापताच निघून गेले.

त्यांचा या कृतीचा नागरिकांनी निषेध केला आहे. दरम्यान, रविवारी सकाळी १० वा.च्या सुमारास भले मोठे पिंपळाचे झाड कलंडून अन्य झाडांच्या फांद्यांत अडकले. तसेच या झाडाची एक फांदी घराला टेकल्याने ग्रामस्थ हरिश्चंद्र हरमलकर यांच्या कुटुंबातील व्यक्तीने अग्निशमन दलाला कळविले.

Harmal News : हरमल भागात पिंपळाचे झाड 
कलंडले; तीन घरांना धोका
Goa Top News: पेडण्यात संरक्षक भिंत कोसळली, पावसाची अपडेट; गोव्यातील ठळक बातम्या

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली आणि झाडाच्या वरील वजनभार हलका करा, आम्ही बुंध्याकडील भाग हटवू, असे सांगितले व निघून गेले, असे हरमलकर यांनी सांगितले.

या झाडामुळे नजीकच्या आणखीन दोन घरांना धोका असून, झाड कोसळल्यास त्या घरांच्या मालकांना नुकसान सोसावे लागेल, असे हरमलकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com