Fake Portuguese Passport: गुजराती नागरिक बनावट पोर्तुगीज पासपोर्ट तयार करुन स्वत:ला युरोपाची कवाडे खुली करुन घेत असल्याचा अनुभव ताजा असतानाच आणखी एका गुजराती महिलेने गोमंतकीय नाव वापरुन बनावट पोर्तुगीज पासपाेर्ट तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अहमदाबाद विमानतळाच्या सहाय्यक इमिग्रेशन अधिकाऱ्याने रीटा मिनेझिस नावाचा डुप्लिकेट पोर्तुगीज पासपोर्ट असल्याबद्दल महेसाणा जिल्ह्यातील काडी येथील रहिवासी गीताबेन महेशकुमार पटेल (५१) विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गीता बेनने बनावट पोर्तुगीज पासपोर्ट वापरून भारताचा ई-टुरिस्ट व्हिसा मिळविला आणि डिसेंबर २०२१ मध्ये लंडनला परतण्यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये दिल्लीमार्गे भारतात प्रवेश केला.
आरोपी महिला या आठवड्यात २ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल – २ येथे सापडली. काउंटर- ११ वर तिला इमिग्रेशन तपासणी दरम्यान पकडण्यात आले.
तक्रारीनुसार, २ डिसेंबर रोजी गीताबेन, गार्विक, लंडन येथून एअर इंडिया विमानाने भारतात आली. इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी सुश्री अश्मिता परमार यांच्या काउंटरवर पोहोचली. त्यावेळी ही बनावटगिरी उघडकीस आली.
इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, इमिग्रेशन क्लिअरन्स दरम्यान डेटाबेसमधून असे आढळून आले की गीताबेनने रिटा मिनेझिस नावाच्या दुसऱ्या भारतीयाचे नाव वापरून फसवणूक करून पोर्तुगीज पासपोर्ट मिळवला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.